Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

दुथडच्या महिला चालवतात घंटागाडी! राज्यात निर्माण केला आगळावेगळा आदर्श, देश पातळीवर होणार गावाचे सादरीकरण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील दुधड ग्रामपंचायतीने आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल करत विकास साधला आहे. ग्रामपंचायत मधील महिला बचत गटाच्या महिला स्वतः घंटागाडी चालवतात. तसेच कचरा उचलून त्यांचे विलगीकरणही स्वतःच करतात. या ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण कामांमध्ये उत्तुंग भरारी घेत राज्यात एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट देऊन ग्रामपंचायतचे कौतुक केले. सदरील ग्रामपंचायतीचे देश पातळीवर सादरीकरण केले जाणार आहे.

“जिवाभावाने जव्हा मी पाहिलं,माझं गावाचं मंदिर शोभलं!” राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील वचनाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या मधील दुधड ग्रामपंचायतीने स्वच्छतेत तसेच विविध नाविन्यपूर्ण कामांमध्ये उत्तुंग भरारी घेत राज्यात एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मंदिर आणि मशीद एकमेकांना लागून असलेलं हिंदू मुस्लिम ऐक्याच, 2661 लोकसंख्येचं आणि 537 कुटुंबाचं एक छोटस गाव दुधड. गावातील प्रत्येक घरात वैयक्तिक शौचालय, त्याचा वापर, पिण्याचे शुद्ध पाणी, वापरण्यासाठी मुबलक पाणी; शाळा, अंगणवाडीमधील मुलामुलींसाठी वेगवेगळी शौचालयाची आणि पाण्याची मुबलक व्यवस्था, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम अथवा अन्य कारणांसाठी गावात येणाऱ्या जाणाऱ्याकरिता सार्वजनिक शौचालयाची सुविधा तसेच गावातील सांडपाणी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि तेही चक्क महिला बचत गटांमार्फत!

गावात एकूण 35 बचत गट आणि सर्व महिलाच कारभारी.या बचत गटांनी गावातील सर्वच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून स्वतःहून स्वच्छतेत जोडून घेतलंय. त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे बचत गटांना आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख 18 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळालय आणि त्या माध्यमातून या बचत गटांनी विश्वास बसणार नाही अशी उत्तुंग झेप घेतलीये.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची कामे झाल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर मोठा प्रश्न होता तो घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा!पण गावातील हा गंभीर प्रश्न या बचत गटांनी चुटकीसरशी सोडवला.

ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या कामात आपणही सहभागी होऊन काम करावे,असा निर्धार करून त्यांनी स्वतःहून ग्रामपंचायतला प्रत्येक कुटुंबासाठी ओला आणि सुखा कचऱ्यासाठी दोन दोन डस्टबिनची मागणी केली आणि कामाला सुरुवात केली.

कुटुंब स्तरावरून कचरा संकलन,वहन,विलगीकरण आणि व्यवस्थापन या सर्व घटकांमध्ये महिला बचत गट महत्वपूर्ण योगदान देत आहे.

गावचे सरपंच गंगासागर चौधरी व ग्रामसेवक संतोष मरमट यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, स्वच्छता विभागाचे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी यांनी यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

सोबतच शेडमध्ये मशरूम तयार करून तेही उत्पन्न घेऊन सांडपाण्यावर नदीकाठी नारळ,चिंच,आंबा,कडुनिंब, सीताफळ,निंबोणी,रामफळ,बोर, जांभूळ,आवळा,बांबू,पिंपळ,वडासह भाजीपाला विकण्याचे ही नियोजन आहे.

Related posts

जैन इंजिनियर्स सोसायटीतर्फ स्केलअप आयबीआयझेड 2.0 स्टार्टअप स्पर्धेचे भव्य ग्रॅन्ड फिनालेचे आयोजन

Gajanan Jogdand

‘नमो रमो नवरात्री’ उत्सवामुळे डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण

Gajanan Jogdand

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: हिंगोली तालुक्यातील उमरा गावास विशेष पुरस्कार

Gajanan Jogdand

Leave a Comment