Marmik
Hingoli live

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री रजनी सातव यांचे 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस सह सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी तसेच जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रजनी सातव ह्या खंबीरपणे कुटुंबाच्या मागे उभ्या राहिल्या. कुटुंबास त्यांनी मोठा आधार दिला. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी बळ दिले.

18 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी त्यांचे नांदेड येथील रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता जिल्हाभर पसरताच जिल्ह्यातून काँग्रेस सह सर्व पक्षातील प्रतिनिधींनी हळहळ व्यक्त केली आहे.

त्यांच्या निधनावर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी प्रतिक्रिया दिली असून माजी मंत्री रजनी सातव यांच्या निधनाची बातमी नेमकीच मला कळाली.

जिल्ह्यातील काँग्रेसचे एक खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात सून, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना ही व्यक्त होत आहेत.

Related posts

अभियंत्याच्या जेसीबीने कामे केली तरच मिळताहेत विहिरीच्या कामाचे बिल! सेनगाव येथील प्रकार

Gajanan Jogdand

ग्रामसेवक संघटनेचे असहकार; प्रलंबित मागण्या सुटल्या नाही

Santosh Awchar

दांडेगाव येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडली

Santosh Awchar

Leave a Comment