मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) ला सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 96. 64 टक्के विद्यार्थी उपस्थित होते तर 486 विद्यार्थी गैरहजर राहिले.
हिंगोली जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा 37 परीक्षा केंद्रावर 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. सकाळ सत्रात इंग्रजी या विषयाचा पेपर पार पडला.
इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेला 14 हजार 478 विद्यार्थ्यांपैकी 13992 विद्यार्थी उपस्थित होते तर 486 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. उपस्थितांचे प्रमाण 96.64 टक्के एवढे होते.
विभागीय मंडळांनी नेमलेल्या पाच भरारी पथकाने आज हिंगोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकाने ने – आन करणाऱ्या सहाय्यक पर्यरक्षकासोबत पोलीस कर्मचारी देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात आजचा पेपर सुरळीत पार पडला आहे.