मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – आज 29 फेब्रुवारी. दर चार वर्षांनी हा दिवस येतो. या दिवसाचे औचित्य साधून गुगलने खास डूडलसह लिप-डे साजरा केला. हा अनोखा दिवस जो दर चार वर्षांनी फक्त एकदा येतो.. या दिवशी जन्मलेल्यांचे वाढदिवसही चार वर्षानंतर येतात. आज जन्मलेल्या चिमुकल्यांना आणि व्यक्तींना विशेष शुभेच्छा..!
जगभरातील पंचांगांमध्ये आजचा दिवस विशेष महत्त्वाचा.. दर चार वर्षांनी येणारा हा दिवस तसा अनोखाच आणि विशेषही. विशेष यासाठी की या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचे वाढदिवस चार वर्षानंतर येतात. त्यामुळे आज जन्मलेल्या चिमुकल्यांचे, व्यक्तींचे वाढदिवस मोठ्या आनंदाने आणि धुमधडाक्यात साजरे केले जातात.
गुगलनेही हा लीप – डे खास डुडलसह साजरा केला. गुगलने एक खेळकर बेडूक आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्यावर 29 तारीख लिहिली आहे. बेडकाने उडी मारली की ही तारीख गायब होत आहे.. संपूर्ण डूडल मध्ये 28, 29 फेब्रुवारी पुढील महिन्याची 1 तारीख दिसत आहे.
गुगलकडून तयार करण्यात आलेल्या या लीपडेला डूडल मध्ये एक तलाव दिसत आहे. ज्यात काही दगड, कमळाची पाने आणि गवतही दिसत आहे.
कमळाच्या पानांवर गुगल शब्दाचे अक्षरे दिसत आहे.. त्या मधील एका कमळाच्या पानावर हा बेडूक बसतो आणि उडी घेऊन गायब ही होतो. या डूडलवर क्लिक केल्यावर 29 तारीख स्क्रीनवर मोठी झाल्याची दिसते. त्यानंतर कमळाच्या पानावर बसलेले बेडूक तलावा बाहेर उडी घेतो आणि 29 तारीख आणि बेडूक दोन्ही गायब होतात..