Marmik
Hingoli live

इयत्ता दहावीच्या परीक्षेला 98 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रावर सकाळ सत्रात मराठी या विषयाचा पेपर पार पडला. यावेळी 98.23 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उपस्थित होते. तर 295 विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

हिंगोली जिल्ह्यात या परीक्षेला 15 हजार 754 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 15,459 विद्यार्थी उपस्थित होते. तर 295 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. उपस्थितांचे प्रमाण 98.23 टक्के एवढे होते. तसेच इयत्ता बारावीच्या एनसीवीसी पेपर – 1 या विषयाचा पेपर पार पडला.

एमसीव्हीसी पेपर – 2 विषयाच्या परीक्षेला 234 विद्यार्थ्यांपैकी 224 विद्यार्थी उपस्थित होते. तर 10 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. उपस्थितांचे प्रमाण 95.73 टक्के राहिले.

विभागीय मंडळांनी नेमलेल्या 5 भरारी पथकाने आज हिंगोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने – आण करणाऱ्या सहाय्यक परिरक्षकासोबत पोलीस कर्मचारी देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात आजचा पेपर सुरळीत पार पडला, असे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

Related posts

कळमनुरी कडे जाणारा रस्ता 60 दिवसासाठी बंद ! रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गाची व्यवस्था

Santosh Awchar

जिल्ह्यातील साठवण तलाव ओव्हरफ्लो

Santosh Awchar

सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम: पानकनेरगाव येथे विविध कार्यक्रम

Gajanan Jogdand

Leave a Comment