Marmik
क्राईम

देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा उध्वस्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील देवदरी येथील गावठी दारू अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून हा दारूचा अड्डा उध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी 800 लिटर रसायन व गावठी दारू (किंमत एक लाख रुपये) नष्ट केला.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे. दि. 1मार्च 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत देवदरी शिवारामध्ये खलील शेख (रा. इंदिरानगर कळमनुरी) यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी अड्डा चालवण्यात येतो अशी माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज दुपारी देवदरी शिवारात छापा मारला असता तेथे जवळपास 800 लिटर दारूचे रसायन व गावठी हातभट्टी दारू बनवीत असताना दोन इसम नामे नूर खान हामिद खान पठाण (रा. इंदिरानगर) व सुनील नारायण आवटे (रा. इंदिरानगर कळमनुरी) असे मिळून आले.

हे दोघे शेख खलील यांच्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर काम करीत होते. पोलिसांनी छापा मारून गावठी हातभट्टी चालक शेख खलील व हातभट्टीवर काम करणारे नूर खान व सुनील आवटे यांच्या विरोध पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशं घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे ,राजू ठाकूर, आकाश टापरे, नरेंद्र साळवे ,आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली आहे.

Related posts

जुन्या वादातून पप्पू चव्हाण यांच्यावर झाला गोळीबार; एक आरोपी पप्पू चव्हाण यांचा भाचा!

Gajanan Jogdand

हापसापुर शिवारात गांजाची शेती! 10.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बाप – लेक ताब्यात

Gajanan Jogdand

नांदेड जिल्ह्यातून हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात सराईत गुन्हे करणारा आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध; पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा दणका! एम पी डी ए अंतर्गत जिल्ह्यातील 6वी कारवाई

Gajanan Jogdand

Leave a Comment