Marmik
हिंगोली कानोसा

हिंगोली पर्यंत येणार ‘जनशताब्दी’, दररोज धावणार रेल्वे

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा वाशीयांचे रेल्वेने मुंबईला जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईहून जालना पर्यंत येणारी जनशताब्दी ही रेल्वे हिंगोली पर्यंत धावणार आहे, अशी माहिती लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सुरू होणाऱ्या या रेल्वेचे श्रेय मात्र त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनेसह इतरांना दिले.

या पत्रकार परिषदेस कळमनुरी मतदार संघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार संतोष (दादा) बांगर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेने मुंबईस जाण्यासाठी एकही रेल्वे गाडी नव्हती कोरोना काळात अजनी एक्सप्रेस बंद पडल्यानंतर ती सुरूच झाली नाही.

मध्यंतरी मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याबाबत हालचाली झाल्या मात्र रेल्वे सुरू झाली नाही. या प्रश्नावर रेल्वे प्रवासी संघटनेसह माध्यमातील प्रतिनिधींनी आवाज उठविला होता. या संदर्भात वारंवार मागणी केल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले होते.

या सर्वांची दखल घेऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना पर्यंत येणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी हिंगोली पर्यंत नेण्याबाबत सांगितले असून 8 ते 10 मार्च या दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या गाडीस हिरवी झेंडी दाखविली जाणार असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले.

तसेच सदरील रेल्वे हिंगोली येथून पहाटे 5 वाजता सुटून मुंबई येथे 2 वाजेपर्यंत पोहोचेल तसेच ही रेल्वे दररोज धावेल असेही सांगण्यात आले आहे त्यामुळे हिंगोलीकरांचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय तळणार आहे.

..तर तीनही विधानसभेवर आमचा दावा – आमदार संतोष बांगर

हिंगोली लोकसभेवर भाजपाने दाबा केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आमदार संतोष (दादा) बांगर यांनी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाष्य करत प्रत्येक पक्षा कडून जागा मागणी केली जाते. यात विशेष काही नाही. आम्हीही विधानसभेच्या तिन्ही जागा मागू. आणि त्या आम्हाला दिल्यास आम्ही त्या जागा जिंकून दाखवू असे सांगत हिंगोली लोकसभेची जागा ही शिवसेनेची (शिंदे गट) च आहे आणि खासदार हेमंत पाटील हेच बहुमताने विजयी होतील असेही त्यांनी सांगितले.u

आम्ही महायुती धर्म पाळूखासदार हेमंत पाटील

पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी आपणही भाजपाने हिंगोली लोकसभेसाठी दावा केल्याचे ऐकले आहे असे विनोदाने सांगितले. हिंगोली लोकसभा जागा वाटपा संबंधाने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी सबुरी घेत आम्ही शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही महायुती धर्म पाळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेची जागा भाजपाला गेल्यास त्यांची ही जागा निवडून आणू. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असे सांगितले.

हेमंत पाटील यांनी यावेळी पिक विमा, हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष आदी प्रश्नांनाही उत्तरे दिली.

Related posts

तीन उमेदवारात पंचरंगी लढत! प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Gajanan Jogdand

हिंगोलीत आष्टीकर आघाडीवर तर जालन्यात दानवे, पंकजा मुंडे पिछाडीवर

Santosh Awchar

हिंगोली लोकसभा: दोन्ही शिवसेना उमेदवारात अतितटीची लढत

Santosh Awchar

Leave a Comment