Marmik
सिनेमा

प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा मागोवा घेणार ‘कन्नी’, 8 मार्चला चित्रपटगृहात

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटात हसू आणि आसूही आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते.

या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.”

Related posts

“धर्मवीर २” चा बॉक्स ऑफिसवर धमाका! १ कोटी ९२ लाखांचा गल्ला

Gajanan Jogdand

मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं दमदार Collaboration: ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चावरे दिसणार वेगळ्या भूमिकेत

Gajanan Jogdand

२ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बाबू’!

Gajanan Jogdand

Leave a Comment