Marmik
क्राईम

जर्मन टाक्यांची चोरी करणारे चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहर पोलीस स्टेशन हददीत आकाशवाणी केंद्र जवळ, हिंगोली जवळील जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र गोडाऊनचा दरवाजा तोडुन जर्मन टाक्यांची चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एक लाख साडेदहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयामध्ये मागील काही दिवसात घडलेल्या मालाविरुदधच्या गुन्हयाचा छडा लावण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटीस हिंगोली यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक समांतर तपास करत होते.

दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी हिंगोली शहर पोलीस स्टेशन हददीत आकाशवाणी केंद्र जवळ, हिंगोली जवळील जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र गोडाऊनचा दरवाजा तोडुन जर्मन टाक्यांची चोरी केली होती. त्याअनुषंगाने पो.स्टे. हिंगोली शहर गुरनं. ६०/२०२४ कलम ४६१, ३८० भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल होता.

दि. ७ मार्च २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनिय माहिती मिळाली की, जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र गोडाऊन मधील चोरी करणारे आरोपी लखन दिलीप चव्हाण (रा. पारधीवाडा, हिंगोली) व शत्रु पुंजाजी चव्हाण (रा. ता. जि. हिंगोली) हे असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने संशईत आरोपी नामे लखन दिलीप चव्हाण (वय २५ वर्ष, रा. पारधीवाडा, हिंगोली) यास ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याचे संबंधाने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याचे वाटयाला आलेले ५० हजार ५०० रुपये काढुन दिले. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेकडुन आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा. पोलीस शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.

Related posts

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

कळमनुरी येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सात जणांविरुद्ध कार्यवाही

Gajanan Jogdand

52 ताश पत्त्यावर चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई, 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Santosh Awchar

Leave a Comment