Marmik
Hingoli live

आदिवासी बचत गटांकडून अर्थसहाय ‌योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतर्गत मंजूर आराखड्यानुसार शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना वैयक्तिक, सामूहिक लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी उद्यापासून 22 मार्चपर्यंत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले अर्ज  कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  

आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर शेळी गट घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेसाठी रहिवासी प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (तहसील कार्यालय), आधार कार्ड, अपंग असल्यास प्रमाणपत्र, विधवा-परितक्ता असल्यास प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार संलग्न केलेल्या बँक पासबूकची प्रत सादर करावी लागेल.

तसेच आदिवासी बचत गटांना शेळी गट (10 शेळी व 1 बोकड) घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेसाठी सर्व सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, सदस्य अपंग असल्यास प्रमाणपत्र, सदस्य विधवा/परितक्ता असल्यास गटाची बँक पासबूकची प्रत सोबत जोडावी लागणार आहे.विहित मुदतीत व परिपूर्ण भरावेत. अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उपरोक्त योजनांमध्ये बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली यांनी राखून ठेवला असून, पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सुनील बारसे यांनी केले आहे.

Related posts

हिंगोलीत येणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह जिल्हाभरात मद्यविक्रीचा महापूर!

Gajanan Jogdand

पत्रकार बाबुराव ढोकणे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर, 27 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात केले जाणार सन्मानित

Gajanan Jogdand

13 ऑगस्ट रोजी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची बैठक

Gajanan Jogdand

Leave a Comment