Marmik
News

केंद्रीय लोकसभा निवडणूक: तारखा जाहीर; सात टप्प्यात होणार निवडणूक

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

नवी दिल्ली – भारतीय निवडणूक निर्वाचन आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन होऊ घातलेल्या केंद्रीय लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 19 एप्रिल ते एक जून या दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असून एकूण सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होईल. यात हिंगोली लोकसभेचा ही समावेश आहे. 4 जून रोजी निवडणुकांचा निकाल लागेल.

17 व्या लोकसभेचा कालावधी जून महिन्यात संपणार आहे अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजता भारतीय निवडणूक निर्वाचन आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला निवडणुकांच्या तारखांकडे देशाचे लक्ष लागले होते.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना विविध पैलूंवर लक्ष वेधले. केंद्रीय लोकसभा निवडणुकीसाठी यंदा 97 कोटी हून अधिक मतदार असून एकोणावीस कोटीहून अधिक तरुण मतदार आहेत.

तसेच 100 वर्ष वयोगट व त्याहून अधिक वयोगट असलेल्या व्यक्ती ची संख्याही भारतात दोन लाख असल्याचे त्यांनी नमूद केले त्याचप्रमाणे निवडणुका दरम्यान कोणी पैसे वाटप करत असेल तर त्यांचे फोटो घेऊन आम्हाला पाठवा 100 मिनिटात निवडणूक आयोगाची टीम येऊन संबंधितांवर कारवाही करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच भारतीय निवडणूक हा उत्सव असल्याचेही नमूद केले.

५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पुढील तारखांना होणार मतदान

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले️

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Related posts

अवकाळी पावसाचा हिंगोलीला तडाखा; रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान, शेतकऱ्यांचा निघाला ‘शिमगा’! नुकसान भरपाईची मागणी

Santosh Awchar

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी

Santosh Awchar

मध्यान्न जेवण निकृष्ट दर्जाचे; आमदार संतोष बांगर यांनी कामगार अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले

Santosh Awchar

Leave a Comment