Marmik
Hingoli live

हिंगोली लोकसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी 119 अर्जांची उचल; एकही अर्ज दाखल नाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी आज पहिल्या दिवशी 41 इच्छुक उमेदवारांनी 119 नामनिर्देशनपत्रांची उचल केली. त्यापैकी एकानेही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.

26 एप्रिल रोजी होणाऱ्या हिंगोली लोकसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 41 इच्छुक उमेदवारांनी 119 नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी उमाकांत पारधी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात.

नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. शनिवार, दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्राचे वितरण व स्वीकृती सुरु राहणार आहे.

परंतु शुक्रवार, दि. 29 मार्च व रविवार, दि. 31 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद राहणार आहे. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Related posts

आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन! 41 ठिकाणी सराईत गुन्हेगारांची तपासणी, तिघांवर गुन्हे दाखल तर दोघांना अटक, जामीन पात्र 20 जणांना वॉरंट

Santosh Awchar

सकल मातंग समाज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आमदार मुटकुळे यांना निवेदन; समाजाच्या प्रलंबित मागण्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी तारांकित प्रश्न करून सोडविण्याची घातली गळ

Gajanan Jogdand

Leave a Comment