मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्याचा सोलार पॅनल बसविण्याचा सर्वे करून देण्यासाठी एम एस ई डी सी एल च्या वरिष्ठ तंत्रज्ञान चार हजार रुपयांची लाच घेताना हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील रहिवासी असलेल्या संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतात शासकीय योजनेअंतर्गत कृषी सोलार पॅनल बसविण्याचा सर्वे करून देण्यासाठी कुरुंदा येथील एम एस ई डी सी एल चे वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मीकांत उत्तमराव बिजलगावे याने तक्रारदार यास 6 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती 4 हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वतः स्वीकारताना सदरील वरिष्ठ तंत्रज्ञान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून 3 एप्रिल रोजी रात्री कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी हिंगोली लाचरुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक विनायक जाधव, पोलिसावलदार ज्ञानेश्वर पंचलिंगे तानाजी मुंढे, राजाराम फुपाटे, चालक पोलीस हवालदार अकबर सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली यांनी केली.
सदरील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक जाधव हे करत आहेत.