मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा आरोग्य यंत्रणेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून आरोग्य विषयक विविध उपक्रम नागरिकांच्या सहभागाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त यावर्षी “माझे आरोग्य, माझा अधिकार” (“my Health, my Right”) हे या दिनाचे संकल्पना घोषवाक्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली आहे. तेंव्हापासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी दवाखाने, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथेही हा उपक्रम साजरा करण्यात यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 2021 च्या अहवालामध्ये जगाच्या निम्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देणे आवश्यक असून त्यादृष्टीने सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून व्यक्ती ही शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्या व्यक्तीला निरोगी व्यक्ती असे म्हटले जाते. आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. तसेच आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे.
दरवर्षी जगभरातील लोकांच्या निरोगी आरोग्याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. म्हणून 2024 चे घोषवाक्य “माझे आरोग्य, माझा अधिकार” यानुसार सर्वत्र दर्जेदार गुणात्मक आणि मोफत आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण व माहिती तसेच सुरक्षित पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, चांगले पोषण, दर्जेदार घरे, पर्यावरणीय आरोग्य आणि जागरूकता वाढविणे, यासाठी हा दिन साजरा केला जातो.