मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीस हिंगोली येथील स्थानिक गणेश शाखेच्या पथकाने शहरातील एनटीसी परिसरातून चोरीच्या कारसह ताब्यात घेतले आहे. यावेळी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे तर चार जणांना पोलिसांनी पकडले आहे. सदरील चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मागील वीस वर्षापासून त्यांच्याकडून मला विरुद्धचे तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
हिंगोली पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील मालाविरुध्दचे गुन्हयास प्रतिबंध व्हावा व या उद्देशाने नेहमी ऑलआउट ऑपरेशन, नाकाबंदी, ‘कोबींग ऑपरेश तसेच विशेष रात्रगस्त करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली व संर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी हिंगोली जिल्हा यांना नेहमी देत असतात. त्याचाच भाग म्हणुन हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे हे दि.०६/०४/२०२४ रोजी हिंगोली शहरात विशेण रात्रगस्त करीत होते.
दिनांक ०६/०४/२०२४ रोजी मध्यरात्री स्था. गुशा.चे पोलीस पथक हिंगोली शहरात रात्रगस्त करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, एन.टि.सी परिसरामध्ये एका ठिकाणी ओलसावलीला काही चोरटे एक कार व मोटार सायकल घेवुन दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असुन त्यांच्या हालचाली संश्यास्पद आहेत, अशी माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर ठिकाणी मध्यरात्री बारा वाजण्याचे सुमारास एन.टि.सी परिसरात रोडलगत असलेल्या इमारतीच्या ओलसावलीला थांबलेल्या संशयीतांवर छापा मारला असता त्यांनी त्यांचे त्यांचे नावे शेख इम्रान शेख कदिर (वय २० वर्ष, रा. सातोना, ता. परतुर, जि. जालना, ह.मु. मु. मस्तानशाहनगर, हिंगोली), सुनिल उर्फ पिंटु प्रकाश रूपनर (वय ३० वर्ष, रा.महादेववाडी, महादेववाडी, हिंगोली), अमजदखा समदखॉ पठाण (वय ३५ वर्ष, रा. पेशनपुरा, हिंगोली) सरताज तांबोळी सत्तार तांबोळी (वय ३५ वर्ष रा. मस्तानशाहनगर, हिंगोली) व पळुन गेला इसम नामे शेख अशपाक शक हमीद (रा.इक्बाल स्कुल, पेशनपुरा, हिंगोली) असे सांगीतले.
सदर आरोपीतांची झडती घेतली असता त्यांचेजवळ घातक हत्यार खंजर, लोखंडी रॉड, तार कापण्याचे कटर, पकड, दोरी, मिरची पुड, चोरीचे मोबाईल अशा प्रकारचे साहित्य मिळुन आले.
तसेच त्यांनी आणलेली कार बाबत विचारपुस केली असता ०२ एप्रिल, २०२४ रोजी मध्यरात्री प्रॉपर नर्सी नामदेव येथुन सदरची कार दरोडा टाकण्यासाठी चोरल्याचे सांगीतले. तसेच त्यांच्या जवळ एक चोरीची मोटार सायकल सुध्दा आढळुन आली आहे.
सदर आरोपीतांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये पो. स्टे हिंगोली ग्रामीण हददीतील डिग्रस क-हाळे शेत शिवारातील ०३ कृषी पंप व पो.स्टे. नर्सी नामदेव हददीतील गिरोली शिवारामधुन एक पानबुडी मोटार चोरल्याची कबुली दिली.
सदरच्या चोरीच्या मोटारी हिंगोली येथील भंगार टुकाणदार नामे शेख मुस्ताक शेख अब्बास व त्यांच्या दुकाणात काम करणारा सयद महेबुब सयद ताहेर दोन्ही (रा.आझम कॉलनी, हिंगोली) यांना सदरच्या मोटारी चोरीच्या आहे असे सांगुन कमी दरात भंगार मध्ये विकल्याचे सांगीतले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, राजु ठाकुर, नितिन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, प्रांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली आहे.