Marmik
क्राईम

कापड दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच रचला खंडणीचा ‘प्लान’! मुख्य आरोपीस राजस्थान येथून अटक, व्यापाऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार

हिंगोली – वसमत येथील एका व्यापाऱ्यास एक कोटी रुपयांची खंडणी मागून न दिल्यास गोळी मारू अशी धमकी दिली जात होती. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. सदरील कट हा या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच रचल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीस राजस्थानी येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रकरणाचा छडा लावण्या कामी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, वसमत शहर पोलीस ठाणे यांनी कामगिरी पार पाडली. तर राजस्थान बलोतरा येथील पोलिसांनी सहकार्य केले. आरोपींना अटक केल्याने भीतीच्या सावटाखाली वावरत असलेल्या वसमत येथील व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.

दिनांक ०७/०४/२०२४ रोजी वसमत येथील फिर्यादी नामे मनोज दतात्रय दलाल (वय ३८ वर्ष, व्यवसाय कापड दुकाण, वसमत) यांनी पो.स्टे. वसमत शहर येथे हजर येवुन तक्रार दिली की, एका अनोळखी मोबाईल नंबर वरून व्हॉटस्अॅप कॉल करून ‘एक कोटी खंडणी देदो नहीतो गोली मारके ठोक देंगे’ अशी वारंवार धमकी येत आहे, अशा पध्दतीची तक्रार दिल्यावरून पो.स्टे. वसमत शहर येथे गुन्हा दाखल झाला होता. तसेच व्यापारी वर्गामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर खंडणीखोराचा छडा लावुन तात्काळ अटक करण्यासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील व पो.स्टे. वसमत शहर चे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांना सुचना दिल्या.

त्यावरून खंडणीखोराचा मोबाईल नंबर वर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता तो स्वीच ऑफ अवस्थेत आढळुन येत होता. त्याअनुषंगाने खंडणीखोराच्या मोबाईल नंबरचा अभ्यास करून खंडणीखोराचे मुळ नाव, गाव, पत्ता प्राप्त करण्यासाठी सायबर सेलचे एक विशेष पथक नेमण्यात आले.

सायबर सेल, हिंगोली च्या विशेष पथकाने बंद असलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण करून माहिती काढली असता सदरचे मोबाईल नंबर हे महेबुब खान अब्दुल खान (वय २४ वर्ष, व्यवसाय वेल्डींग काम, रा. मुसलमानका वास, खेर, ता. पचपदरा, जिल्हा बलोतरा राजस्थान) असे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बलोतरा पोलीस अधीक्षक कुंदन कवरीया यांना सदर आरोपीचा पत्ता पाठवुन आरोपी पकडणेसाठी मदत करण्याची विनंती केली व पो.स्टे. वसमत शहर चे एक पथक राजस्थानला रवाना केले.

पोलीस पथकाने आरोपी महेबुब खान यास राजस्थानमधुन ताब्यात घेवुन हिंगोली येथे आणुन विचारपुस केली असता त्यास वसमत येथील व्यापा-याची माहिती देणारा इसम नामे फिर्यादी मनोज दतात्रय दलाल यांच्या कापड दुकाणातच काम करणारा कृष्णा तुकाराम बेंडे (वय १९ वर्ष, रा. पळशी, ता.वसमत) हा त्याचा पळशी येथील मित्र नामे ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे (वय २३ वर्ष, धंदा अॅटो चालक, रा. पळशी, ता. वसमत) याच्या मार्फतीने मुख्य आरोपी महेबुब खान यास दुकाण मालक मनोज दलाल यास गोळी मारण्याची धमकी देवुन एक करोड रूपये मागण्यास लावुन मुख्य खंडणीचा प्लॅन आखल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून, आरोपी नामे महेबुब खान अब्दुल खान (वय २४ वर्ष, व्यवसाय वेल्डींग काम, रा. मुसलमानका वास, खेर, ता. पचपदरा, जिल्हा बलोतरा राजस्थान), ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे (वय २३ वर्ष, धंदा अॅटो चालक, रा. पळशी, ता. वसमत), कृष्णा तुकाराम बेंडे (वय १९ वर्ष, रा. पळशी, ता. वसमत) यास अटक करण्यात आली असुन पोलीस कस्टडी मध्ये ठेवण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरमकर हे करीत आहेत.

एका किचकट व दहशत निर्माण करणा-या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासात हिंगोली पोलीसांकडुन छडा लावुन आरोपी अटक केल्यामुळे वसमत मधील व्यापारी वर्गात मोठे समाधानाचे वातावरण आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, मारोती थोरात (उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विदुबोने, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली, पोलीस अंमलदार दिपक पाटील, दतात्रय नागरे, इरफान पठाण, सायबर सेल, हिंगोली, राजु गुठ्ठे, प्रभु मोकाडे, डी.जी. मात्रे, पो.स्टे. वसमत शहर, शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे स्थानिक गुन्हे शाखा. हिंगोली यांनी केली.

जनसंपर्क अधिकारी

पोलीस अधीक्षक कार्यालय,
हिंगोली

Related posts

17 टवाळखोर व्यक्तींवर दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई

Santosh Awchar

जर्मन टाक्यांची चोरी करणारे चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

दरोड्याचा डाव उधळला; फिर्यादीच्या गळ्याला लावला होता विळा! बोथी येथील थरार, पाच आरोपींसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment