Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

संभाजीनगरात 1 हजार 936 बालके तीव्र कुपोषित! बालकांच्या श्रेणी वर्धनासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यात मार्च महिन्यात 1 हजार 936 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. तर 6 हजार 519 बालके मध्यम मिळून आली आहेत. सदरील बालकांच्या श्रेणीवर्धनासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे.

औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगर व जिल्ह्यात माहे मार्च 2024 च्या पोषण ट्रॅक्टर अहवालानुसार एकूण 1 लाख 68 हजार 248 बालके आहेत. त्यापैकी 1 हजार 936 बालके तीव्र कुपोषित आढळून आले आहेत. तर 6 हजार 519 बालके मध्यम आढळून आली आहेत.

सदरील बालकांच्या श्रेणी वर्धनासाठी होम बेस व्हीसीडीसी, गोपाळ पंगत, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदरील बालकांच्या पालकांचे समुपदेशनही करण्यात आलेले आहे.

अंगणवाडी ताईंच्या संपानंतर परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. संपकाळात बालकांना आहारासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती.

संपकाळात आरोग्य व शिक्षण विभागाच्या सहकार्याने अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आल्या आहेत. बालकांच्या श्रेणीवर्धनासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे.

Related posts

पुलक मंच परिवार तर्फे महाआरती व नृत्य प्रतियोगीतेचे भव्य आयोजन

Gajanan Jogdand

दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या ठेवीदारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा

Gajanan Jogdand

परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधीवर माहितीपूर्ण मोफत सेमिनारचे आयोजन

Gajanan Jogdand

Leave a Comment