Marmik
Hingoli live

हिंगोली लोकसभा निवडणूक : मतदान केंद्राची मराठी व इंग्रजी भाषेतील यादी प्रसिद्ध  

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – जिल्ह्यात 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या प्रस्तावास  भारत निवडणूक आयोग यांची मान्यता प्राप्त झाली आहे.  

हिंगोली जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी जिल्हास्तरावर शासनाच्या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 92-वसमत, 93-कळमनुरी व 94 हिंगोली विधानसभा मतदार संघ,

जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली असून, मतदारांना ती पाहण्यास उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.

Related posts

पर्यावरणास हानिकारक ठरत असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या पतंगाची ‘दोर’ पोलिसांनी ‘कापली’! तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

Santosh Awchar

ऑपरेशन मुस्कान : 49 इसमांना शोधण्यात पोलिसांना यश

Santosh Awchar

कोळसा शिवारात गांजाची शेती! एक लाख 45 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त

Gajanan Jogdand

Leave a Comment