Marmik
क्राईम

अवघ्या काही तासात चोरीला गेलेली जेसीबी मशीन हस्तगत, चोरटे व विकत घेणारे बाहेर जिल्ह्यातील

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आडगाव लासिना येथील एकाची जेसीबी मशीन चोरीस गेल्याची घटना घडली होती. सदरील चोरीस गेलेली मशीन हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात हस्तगत केली. सदरील मशीन चोरणारे चोरटे व मशीन विकत घेणारे हे परभणी, बीड जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी तिघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस स्टशेन वसमत ग्रामीण हददीतील इंजनगाव पुर्व शिवारातील आखाड्यावर फिर्यादी नामे अंबादास भोरे (रा. आडगाव लासीना) यांचे मालकिची डी.एस्क. कंपनीची जे.सी.बी. मशीन (किंमत २० लाख रूपये) ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात आरोपींनी नमुद जे.सी.बी.चोरी करून नेली होती.

सदर जे.सी.बी. चा फिर्यादी यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतु मिळून आली नाही. फिर्यादी यांनी त्याबाबत पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे दिलेल्या फिर्याद वरून पोलीस स्टेशन नमुद जे.सी.बी. चोरी बाबत गुरनं. ११२/२०२४ कलम ३७९ भादवी दाखल करण्यात आला होता.

नमुद फिर्यादी यांचे चोरीला गेलेली जे.सी.बी. तात्काळ शोधुन काढुन गुन्हयातील सहभागी आरोपी पकडणे बाबत पोलीस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक नमुद यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन तपासाची चके गतिमान करून गोपनीय बातमीदार मदतीने तपास करत नमुदचा गुन्हा नामे- संजय अंबादास इंगोले (वय ३२ वर्ष रा. देगाव ता. पुर्णा) यांनी त्याच्या ईतर साथिदांरा मार्फत मिळुन केल्याबाबत पथकाला माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने दिनांक १५/०४/२०२४ रोजी आरोपी नामे- संजय अंबादास इंगोले यास ताब्यात घेवुन विचारपुस करता तपासात नमुद आरोपीने त्याचे ईतर साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली.

तपास पथकाने गुन्हयात सहभागी ईतर ०२ आरोपी नामे- अल्लाबक्ष मेहबुब पठाण (वय ३१ वर्ष रा. पाथरी जि.परभणी) व युवराज उत्तम कठाळे (वय ४० वर्ष रा. दहवंडी ता. शिरूर जि.बीड) यांना ताब्यात घेवुन नमुद आरोपींच्या ताब्यातुन फिर्यादी यांचे चोरीला गेलेले डी.एस्क. कंपनीची जे.सी.बी. मशीन (किंमत २० लाख रूपये) जप्त करून नमुद तिन्हा आरोपींना जे.सी.बी. मशीनसह पुढील तपासकामी वसमत ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, दिपक पाटील, दत्ता नागरे, अशोक
काकडे यांनी केली.

Related posts

मानवत खून प्रकरण; वर्षभरापासून फरार आरोपीस घातक हत्यारासह घेतले ताब्यात

Santosh Awchar

सतत गुन्हे करणारी टोळी पोलीस अधीक्षकांच्या हिटलिस्टवर ! पुसेगाव येथील दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

धान्य चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment