Marmik
दर्पण

लोकसभा निवडणूक : सर्वश्रेष्ठत्वाचा अहंभाव योग्य नव्हे

गणेश पिटेकर

सध्या देशात लोकशाहीचा लोकोत्सव (लोकसभा निवडणुकाचा हंगाम) सुरू आहे. उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत. प्रत्येक वेळा निवडणुकांमध्ये हे आपणास पाहायला मिळते; पण यंदा अहमदनगर आणि पुण्यात वेगळेच पाहायला मिळाले. शिक्षण कमी आहे म्हणून धनगेकर आणि इंग्रजी येत नाही म्हणून लंके यांना ट्रोल केलं गेलं. राजकीय अभिजनामध्ये ‘आपण निवडणूक लढवू आणि जिंकू’ हा जो सर्वश्रेष्ठत्वाचा अहंभाव आहे तो योग्य नव्हे.

देशात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. सध्या प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. गेल्या दिवसांमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके निवडणूक रिंगणात आहेत. विखेंनी लंके यांना इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले होते. वाक्यरचना इंग्रजीत जरी व्यवस्थित केली तरी उमेदवारी मागे घेईल असे आव्हान विखे यांनी केले होते. याला प्रत्युत्तर लंके यांनी इंग्रजीत दिले होते.

काय तर तुम्हाला इंग्रजी येत नाही आणि त्यामुळे तुमची निवडणूक लढण्याची लायकी नाही. ही भाषा सर्वसामान्यांची आहे का? बरं ती येत नसल्याने तुम्ही संसदेत जाऊ शकत नाहीत. केवळ आम्हाला इंग्रजी येत असल्याने लोकांचे प्रश्न आम्हीच मांडू शकतो. ही ब्राह्मण्यवादी वृत्ती बरोबर नाही. सर्वसामान्यांनी निवडणूकांच्या राजकारणापासून दूर रहावे. त्यांनी फक्त मतदान करावे. हेच त्यांचे कर्तव्य आहे. आम्हाला इंग्रजी येते म्हणजे आम्ही श्रेष्ठ हा दावा विखे यांच्या विधानातून अधोरेखित होतो.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेस पक्षाचे रवींद्र धनगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणूक मैदानात आहेत. धनगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरून ट्रोल केले गेले. सुसंस्कृत पुण्याला आठवी पास खासदार अशा आशयाचा पोस्ट व्हायरल होत होती. याला धनगेकर यांनी प्रत्युत्तर ही दिले. पण प्रश्न उरतोच की शिक्षण कमी आहे म्हणजे निवडणूक लढू नये का? फक्त उच्च शिक्षण घेतलेल्यांनीच निवडणूक लढावे का?

विखे यांचे इंग्रजी आणि पुण्यातील शिक्षणाचा मुद्दा विचारात घेतल्यास आज संसदेत अनेक खासदार इंग्रजी आणि उच्च शिक्षण घेतलेले आहेत. पण त्या सर्वांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्न किती सोडवले आहेत? बरं त्यांचा लोकांना शिक्षण घेताना किती झाला आहे? निवडून आल्यानंतर आपण काय करणार आहोत? लोकांचे अडीअडचणी कमी कसे कमी करता येईल ? याबाबत काही न सांगता एकमेकांचे उणीदूणी काढून उमेदवार नेमके काय साध्य करतात?

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धनगेकर’ असा प्रश्न विचारला होता. त्याला निवडून आल्यानंतर धनगेकर यांनी उत्तर दिले. राजकीय अभिजनामध्ये आपण निवडणूक लढवू आणि जिंकू हा जो सर्वश्रेष्ठत्वाचा अहंभाव आहे तो योग्य नव्हे.

Related posts

एकमेकास सहाय्य करू..!

Gajanan Jogdand

नद्यांना हलक्यात किती घेणार?….

Gajanan Jogdand

हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषावर उच्च पातळी बंधाऱ्यांचा उतारा!

Gajanan Jogdand

Leave a Comment