Marmik
दिसलं ते टिपलं

विना नंबर ‘ऑन ड्युटी इलेक्शन’! पोलीस यंत्रणा झोपेत

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील लोकसभेचे मतदान 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात पार पडले. मतदानामुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणा या कामात लागली होती. अनेक वाहनेही यासाठी घेण्यात आली होती, मात्र विना नंबर प्लेट असलेले एक वाहन चर्चेत येत आहे. सदरील वाहनावर ‘ऑन ड्युटी इलेक्शन’ असे स्टिकर लिहिलेले आढळून आले आहे. सदरील वाहन हिंगोली – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. विशेष म्हणजे या मार्गावर असलेल्या पोलिसांना ते दिसून येऊ नये हे विशेष.

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून हिंगोली लोकसभेचे मतदान दुसऱ्या टप्प्यात नुकतेच पार पडले.

या मतदान निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास अनेक वाहनांची आवश्यकता पडली होती. त्यानुसार प्रशासनाने ती लिलया पारही पाडली. मतदान प्रक्रिया पार पाडून सर्व मतदान यंत्र संग्रहित ठेवण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.

या निवडणुकीसाठी प्रशासनाने अनेक वाहने उपयोगात आणली. मात्र विना नंबर प्लेट असलेली वाहनेही उपयोगात आणली होती की काय? अशी शंका येऊ लागली आहे.

हिंगोली – नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असेच विना नंबर प्लेट असलेले एक वाहन ज्याच्या मागे काचेवर ‘ऑन ड्युटी इलेक्शन’ असे लिहिलेले आढळून आले आहे. सदरील वाहनातून काही जुन्या लोखंडाचे साहित्य तसेच काही सामान घेऊन जात असल्याचे आढळून आले.

सदरील वाहन पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास पडू नये हे विशेष. विशेष म्हणजे हे वाहन राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा झोपेत आहे की काय? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. हे वाहन पुढे कुठे गेले याचा पत्ता लागू शकला नाही.

राष्ट्रीय महामार्गावरून असे विना नंबर प्लेट ‘ऑन ड्युटी इलेक्शन’ स्टिकर लावलेली वाहने धावू लागले आहेत हेच यावरून दिसून येत आहे.

Related posts

आरोग्य केंद्र उठले ग्रामस्थांच्या जीवावर! रुग्णांना दिली जाताहेत एक्सपायरी औषधी!! जिल्हा आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण नाही

Gajanan Jogdand

सिंचन विभागाच्या परिसरात उमलले रानफुले; येणाऱ्यांचे घेताहेत लक्ष वेधून

Gajanan Jogdand

हिंगोलीत जैविक कचऱ्याचा प्रश्न गंभीर; आरोग्य यंत्रणेला गांभीर्य नाही!

Gajanan Jogdand

Leave a Comment