मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एनटीसी भागात सिमेंट रस्त्याची कामे करण्यात आली. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होऊन अवघे तीन ते चार महिने उलटलेले आहेत. सदरील रस्त्यांवर लाखो रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. मात्र रस्त्यांची कामे हवी तशी झालेली नसल्याचे दिसते.
अवघ्या सहा महिन्याच्या आतच अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. संबंधित ठेकेदाराने रस्त्यांची कामे केल्यानंतर योग्य प्रमाणात रस्त्यांना पाणी दिले नसल्याचे समजते. तसेच रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचेही दिसते. त्यामुळे या भागातील रस्त्यांच्या कामावरील निधीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसते.
झालेल्या रस्त्यांवर कडे गेल्याने डांबर टाकून तडे गेलेल्या फटी फुजविण्यात येत आहेत. या सर्व प्रकाराकडे नगर परिषदेचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.