Marmik
Hingoli live

उद्या बारावीचा निकाल : दुपारी 1 वाजेपासून विविध संकेतस्थळावरून पाहता येतील गुण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – फेब्रुवारी-मार्च 2024  मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.           

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024  मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. ही संकेतस्थळे खालील प्रमाणे आहेत. 

1) mahresult.nic.in

2) http://hscresult.mkcl.org

3) www.mahahsscboard.in

4)https://results.digilocker.gov.in

5)www.tv9marathi.com

6)http://results.targetpublications.org       

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध आहे.            

यासोबतच  mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

गुण पडताळणीसाठी व उत्तर पत्रिका छायाप्रतिसाठी दिनांक 22 मे, 2024 ते 5 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related posts

एका तृतीयपंथ उमेदवारासह 48 जणांचे अर्ज वैध

Gajanan Jogdand

ढोल – ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन, पावसाने फिरवली पाठ!

Gajanan Jogdand

जवळा बु. शालेय समिती बिनविरोध गठीत

Gajanan Jogdand

Leave a Comment