मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज 21 मे रोजी जाहीर झाला. यंदा हिंगोली जिल्ह्याचा निकाल 91.88% एवढा लागला असून गतवर्षीपेक्षा तो तीन टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज 21 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला.
निकाल पाहण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तो पाहिला. संकेतस्थळावरील मोठ्या प्रमाणात भेटीमुळे एक दोन संकेतस्थळ बंद होते. यंदा हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल 91.88% एवढा लागला आहे. गतवर्षी हा निकाल ८८.७१ टक्के एवढा होता. यंदा त्यात वाढ झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे, कळमनुरी 90.63% यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 67 एवढे आहे. वसमत तालुक्याचा निकाल 92.56% एवढा लागला असून विशेष प्राविण्य असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 356 एवढी आहे.
सेनगाव तालुक्याचा निकाल 92.57% एवढा लागला असून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 300 एवढी आहे. तर औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल 92.63% एवढा असून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 338 एवढी आहे. तसेच हिंगोली तालुक्याचा निकाल ९१.१६ टक्के एवढा असून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 268 एवढी आहे.