मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात एस एस सी (इयत्ता दहावी) चा निकाल 27 मे रोजी दुपारी जाहीर झाला. बारावीनंतर इयत्ता दहावीच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. यंदा हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल 92.22 टक्के एवढा लागला आहे. यात वसमत तालुका अग्रेसर असून तालुक्याचा निकाल 94.36% एवढा लागला आहे. तर सर्वात कमी हिंगोली तालुक्याचा 89.46% एवढा लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च – एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी चा निकाल 27 मे रोजी दुपारी जाहीर झाला.
यामध्ये गतवर्षीपेक्षा हिंगोली जिल्ह्याच्या टक्केवारीत वाढ झाली असून हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९२.२२ टक्के एवढा लागला आहे.
यामध्ये हिंगोली तालुक्याचा निकाल 89.46% कळमनुरी तालुक्याचा निकाल 91.37% वसमत तालुक्याचा निकाल ९४. ३६% सेनगाव तालुक्याचा निकाल 93.58% तर औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल 93.28% एवढा लागला आहे.
या परीक्षेत हिंगोली तालुक्यात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1031 एवढी आहे. तर कळवण्यात तब्येत 27 वसमत तालुक्यात 1450 सेनगाव तालुक्यात 709 तर औंढा नागनाथ तालुक्यात 495 एवढी आहे.