मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील एबीएम केंद्रीय शाळेत शिक्षण घेत असलेल्या तसेच नायशा अयाज अन्सारी या विद्यार्थिनीने इसरो कडून घेण्यात आलेल्या उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नायशाला संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून गतवर्षी तिच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे हिंगोली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कडून दरवर्षी उत्तुंग तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करून महाराष्ट्रातून 60 विद्यार्थी निवडले जातात. या विद्यार्थ्यांना इसरो येथे बोलावून सर्व माहिती दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे मोठी पर्वणी असते.
यंदा इस्रो कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत हिंगोली येथील नायशा अयाज अन्सारी या विद्यार्थिनीने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्तुंग भरारी घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या सोबत शाळेतील आर्यन नितीन हजारे हा विद्यार्थीही उत्तीर्ण झाला आहे.
दोघांचेही शाळेचे संचालक हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त दिलीप बांगर, संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा मार्मिक महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार यांनी तसेच शाळेतील शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.