मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २८.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वाधिक ५७.८० आणि सेनगांव तालुक्यात सर्वात कमी १३.७०मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे.
हिंगोली ५७.८०(६२.४०), कळमनुरी १७.३०(५५.१०), वसमत २०.५० (३५.८०), औंढा नागनाथ ३१.५० (८०.५०) आणि सेनगांव तालुक्यात १३.७० (४७.००) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक १ जून २०२४ ते १२ जून २०२४ पर्यत सरासरी ६२.४० मिलीमीटर पाऊस पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या २४ तासात सरासरी 8.9 मि.मी. (102.1) पावसाची नोंद झाली आहे.
कयाधूस आले पाणी
हिंगोली शहरा जवळून वाहणाऱ्या कयाधू नदीस मृग नक्षत्राच्या दुसऱ्या पावसात पाणी आले सर्वाधिक पाऊस हिंगोली तालुक्यात नोंदला गेला त्यामुळे कयाधू नदीचे पात्र पावसाच्या पाण्याने खळाळून वाहिले कयाधू नदीस आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती