Marmik
दर्पण

प्रिय दाजीस…!

विशेष प्रतिनिधी

आपण महाराष्ट्राचे लाडके की काय असे मुख्यमंत्री आहात! महाराष्ट्रातील समस्त जनतेने आपणास डोक्यावर घेतलेले आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकांच्या तोंडावर आपणास लाडक्या बहिणींची आठवण झाली!!

भावाने काही वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर बहिणींची आठवण काढल्याने बहीणही भावाच्या प्रेमाने उन्हाळून आणि झाले आम्हा सर्वांवर तुमच्या बहिणींची वक्रदृष्टी पडली. भाऊ केवढ्या प्रेमाने महिन्याला दीड हजार रुपये पाठवणार म्हटल्यावर कागदपत्रांची जुळवाजुळव नको त्यावर रंगीत फोटो, वयाचा पुरावा आणि सर्व कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आमच्या नशिबी आले.

तुमची बहीण आम्हाला जरा म्हणून उसंत पडू देत नाही. ‘आलेया भोगासी असावे सादर’ याप्रमाणे आम्हाला निमुटपणे तुमची बहीण सांगेल ती कागदपत्रे मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या दारांवर कार्यालय उघडायच्या आधी नंबरबारी लावावी लागते. त्यात तुमच्या बहिणीला शेजारच्या ताईने आजच अकाउंट उघडले असे कळले की, रात्रीचे जेवणही आम्हाला न खडखड करता मिळत नाहीये!

कधी कधी वाटतं तुमच्या बहिणीला माहेरी ‘वर्षा’वर सोडून यावे एवढी कचकच तुमची बहीण पाठीमागे लावतेय! तुम्ही घोषणा केली तेव्हापासून आमच्यासोबत तुमची बहीणही कार्यालयात जाऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना कागदपत्रांसाठी गयावया करू लागली आहे. हे निश्चितच एक भाऊ म्हणून तुम्हाला पटणार नाही.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीची आठवण झालीच आहे तर कोणत्याही एका कागदावर बहिणीचा सही, अंगठा घेऊन बहिणीच्या पदरात दीड हजाराची रक्कम टाकून तिची ओटी भरावी आणि आमची यातून सुटका करावी ही विनंती!

कळावे.

आपला

लाडक्या बहिणीचा गांजलेला नवरा

Related posts

“शंभूंचे शौर्य;बलिदान मास समाप्ती”…

Mule

मराठी माणसाचे मायमराठी मारण्यासाठी प्रयत्न सुरू?

Gajanan Jogdand

‘संकल्प पत्र’; हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय?

Gajanan Jogdand

Leave a Comment