मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील सरपंच लखन शिंदे यांना यशवंत संघर्ष सेनेकडून यंदाचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार जाहीर झाल्याने लखन शिंदे यांचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.
हिवरा जाटूचे विद्यमान युवा सरपंच लखन शिंदे यांनी गावच्या कारभाराची धुरा सांभाळल्यापासून गाव विकासाच्या वाटेवर आहे. उन्हाळ्यात लखन शिंदे यांनी गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तसेच गावात विविध विकासात्मक कामे खेचून आणले आहेत त्याचप्रमाणे सरपंच लखन शिंदे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.
सरपंच या नात्याने त्यांनी गावचा केलेला विकास आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुरवाडे यांनी सरपंच लखन शिंदे यांना यंदाचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच त्यांना सदरील पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लखन शिंदे यांचे कळमनुरी विधानसभेचे विद्यमान लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर, भावी आमदार राम कदम यांनी अभिनंदन केले असून जिल्हाभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.