मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हवामान विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या 26 जुलै रोजी होणाऱ्या पुरवणी परीक्षेत अंशता बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ पुणे विभाग तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची सांगता येणार सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पावसाच्या संतत धारेने तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून बारावी पर्यंतच्या शाळांना 25 जुलै रोजी सुट्टी देण्यात आली होती.
विदर्भात होत असलेल्या अतिवृष्टीने तेथील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे हवामान विभागाकडून 26 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेच्या दिनांक 26 जुलै 2024 च्या पेपर मध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.
इयत्ता दहावीचा 26 जुलै 2024 रोजी होणारा पेपर दिनांक 31 जुलै 2024 व इयत्ता बारावीचा 26 जुलै 2024 रोजी होणारा पेपर दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे याची इयत्ता दहावी बारावी पुरवणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन हिंगोली माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.