मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – कचनेर जवळील धर्मतीर्थ क्षेत्र येथे आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांचाा २०२४ चा चातुर्मास उत्साहात सुरु असुन आचार्यश्रींच्या सानिध्यात आज ५२ वा जन्मदिवस हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजेपासुनच जन्म दिवसानिमीत्त्त आचार्यश्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी नवग्रहतीर्थ वरुरचे भटटारक धर्मसेन महाराज व कोल्हापुर मठाचे लक्ष्मीसेनजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जन्मदिवासा निमीत्त्त नागपुर येथील नितीन नखाते ,राजेश जैन यांनी आचार्य गुप्तीनंदी गुरूदेव यांचे पादपक्षालन व पुजा करण्याचे सौभाग्य मिळाले तसेच गुरुदेवांना पिच्छी देण्याचा मान संजीव जैन लखनौ यांना मिळाला. तसेच शास्त्र देण्याचा मान होलास आशा रोमील सोनी इंदौर यांना मिळाला तर कमंडल भेटचा मान मनोज रजनी जैन परिवार बाराबंकी यांना मिळाला.
तसेच माला भेट देण्याचा मान महावीर कुसुम साक्षी गंगवाल यांना मिळाला. यावेळी मिलन सुनिधी अमित जैन परिवाराकडुन महामृत्युंजय विधान संपन्न झाले. सर्व प्रथम सकाळी भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यामध्ये महाशांतीधारा, वास्तुविधान, नवग्रह होम, प्रतिष्ठाचार्य पंडीत मधुर जैन यांच्या मंत्रोपचाराने करण्यात आले.
सर्व प्रथम कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन प्रमोद आनंद जैन, सुधा संजीव झवेरी परिवार, आशा रोमील सोमी परिवार, मिलन अमित जैन परिवार, रविंद्रकिरण पाटील परिवार, सुभाष कासलीवाल, ललीत पाटणी, विनोद लोहाडे, भरत ठोले, आर.आर.पहाडे, प्रमोद जैन चंद्रशेखर पाटनी गुलाबचंद कासलीवाल राजेंद्र पाटनी आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मंगलाचरण आस्थाश्री माताजी यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन नखाते, संजय पापडीवाल, किर्ती पाटणी यांनी केले. यावेळी धर्मतीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटणी यांनी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांच्या ५२ व्या जन्मदिवसा निमीत्त आपली विनयांजली अर्पण केली व ते म्हणाले की आचार्यश्रींच्या आर्शिवादाने छत्रपती संभाजीनगर शहरासह आचार्य हिराकाका प्रांगण गनधर विदयापीठ आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव सभागृह, बालाजीनगर जैन मंदिर, अरिहंतनगर जैन मंदिर, राम नगर जैन मंदिर आदी मंदिराचा जिर्णोध्दार आचार्यश्रींनी केला आहे.
तसेच यावेळी क्षृल्लिका मुनि विमलगुप्तजी महाराज, गणनी आर्यिका आस्थाश्री माताजी, क्षुल्लक शांतीगुप्तजी महाराज यांनी सुध्दा आचार्यश्रीं बददल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित समाज बांधवांना आपल्या सुमधुन वाणीने मार्गदर्शन करतांना आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव म्हणाले की, मानवसेवा ही आमचा परम धर्म व कर्तव्य आहे कारण सेवा केल्याने मन पवित्र होत असते, सेवा हि व्यवहार धर्म असुन एक दुस-या प्रति प्रेम,वात्सल्य,आदर महत्वाचे असुन जैन धर्ममामध्ये सेवा व गुरूच्या वेयावृत्त्तीला महत्वाचे स्थान आहे असे प्रतिपादन आचार्यश्रींने केले तसेच छत्रपती संभाजीनगर येथील समाजाची समाजीक एकता प्रशंसनीय आहे असेही त्यांनी सांगीतले. यावेळी राजाबजार, अरिहंतनगर बालाजीनगर, शांतीनाथ हौ.सो.हडको, सिडको, छावणी, पाचोड, आडुळ आदी ठिकाणच्या महिला मंडळानी विविधि द्रव्यांनी पुजा केली.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी संभाजीनगर येथील गुलाबचंदजी सुनिल अनिल कासलीवाल परिवार भांबेरीवाला यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. यावेळेस गनेश मानसकर चा वतीने आचार्य गुप्तीनंदी गुरुदेवावर 101 कीलो फुलाने पुष्पवृष्टी केली कार्यक्रम करण्यासाठी अध्यक्ष चंद्रशेखर पाटणी, वरीष्ठ उपाध्यक्ष संजय पापडीवाल, उपाध्यक्ष राजेंद्र पाटणी, महामंत्री पवन पापडीवाल, सहमंत्री डॉ.सतीश लोहाडे, कोषाध्यक्ष गुलाबचंद कासलीवाल सुनील काला प्रकाश अजमेरा अरुण पाटनी मनोज सेठी शरद जालनापुरकर शंशाक जितुरकर चंद्रशेखर पाटनी नेरीवाला धर्मतीर्थ क्षेत्र विकास समितीने परिश्रम घेतले, अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली