मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छञपती संभाजीनगर – गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर शाळेत आज भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साह संपन्न झाला.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनलालजी पांडे, ध्वजारोहक मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी शांतीलालजी पहाडे (वैजापूर) तसेच डॉ. योगेश जाधव , संस्था अध्यक्ष दिनेश गंगवाल, संस्था सचिव डॉक्टर प्रेमचंदजी पाटणी, सदस्य निर्मल ठोळे, आर. के. सेठी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच एडवोकेट विजय राठोड, श्रीकांत भालेराव इत्यादी मंडळी उपस्थित होती.
ध्वजारोहणानंतर णमोकार मंत्र, प्रतिज्ञा व संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली वर्ग नववीतील मुला मुलींची मानवंदना ध्वज व पाहुण्यांना देण्यात आली. प्रास्ताविक पर्यवेक्षक नवले गुरुजींनी केले. एस बी जैन व तपसी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बनविलेल्या भितीपत्रकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तीन विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य यावर भाषणे केली.
आजच्या दिवशी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व बिस्किट पुडा देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील कैलास गोरे यांनी टाकाऊतून टिकाऊ स्वरूपात बनविलेले प्रोजेक्टर शाळेला भेट केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये शांतीलाल पहाडे, डॉक्टर योगेश जाधव, संस्था अध्यक्ष दिनेशजी गंगवाल, डॉ प्रेमचंदजी पाटणी, श्रीकांत भालेराव, आर. के. सेठी इत्यादींनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
शांतीलाल पहाडे, डॉ. योगेश जाधव, चेतन पांडे यांनी शाळेला योगदान दिले. तसेच डिजिटल क्लास रूम साठी मदतीची घोषणा केली. अजीत गांधी, आर. के. सेठी यांनी गुरुकुलच्या१५० विद्यार्थ्यांना गणवेश दिले. अध्यक्षीय समारोप शाळा समिती अध्यक्ष मदनलाल पांडे (लासुर स्टेशन) यांनी केला.
आभार प्रदर्शन महेंद्र वाकळे तर सूत्रसंचलन अन्नदाते व प्रतीक्षा जैन यांनी केले. कार्यक्रमानंतर शाळा समिती अध्यक्ष मदनलाल पांडे यांचे तर्फे सर्व पाहुण्यांना अल्पोपहाराचे तसेच गुरुकुल विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिरच्या स्टाफने परिश्रम घेतले.