मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – पहाटे साडेचार वाजेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खटकाळी 33 के.व्ही. उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. त्यामुळे येथून शहरात वीज पुरवठा होत असलेला सर्व वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. परिणामी एमपीएससी भागासह अनेक ठिकाणच्या व्यवसायिकांच्या दुकानात पाणी घुसले आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी येथील आलो काढणे गरजेचे असून विद्युत उपाध्येयनता सचिन बेरसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस मध्यरात्री थोडाफार विश्रांती घेत सुरूच राहिला. पहाटे साडेचार वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली 12 वाजेपर्यंत पाऊस कोसळत आहे. होत असलेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
मात्र सुरू असलेल्या संततधार पावसाने हिंगोली शहरातील खटकाळी येथे असलेल्या 33 के.व्ही. उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी येथून हिंगोली शहरासह लगतच्या भागात होत असलेला विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.
विद्युत पुरवठा बंद झाल्याने व पावसाची संततधार सुरूच असल्याने हिंगोलीतील एनटीसी भागासह अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच काही व्यवसायिकांच्या दुकानांमध्येही पाणी शिरल्याचे वृत्त आहे.
खटकाळी 33 के.व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी येथून पाणी काढण्याचे प्रयत्न केले जात असून सहाय्यक विद्युत अभियंता सचिन बेरसले यांच्यासह वरिष्ठ येथे भेट देत आहेत.