मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – श्रीगणेशोत्सव – 2024 उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी, या महिलांना लखपती दीदी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही श्रीगणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम ,तालुका व जिल्हा पातळीवर स्टॉल उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्ती विक्री स्टॉलचे उद्घघाटन आज जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित या उद्घघाटन कार्यक्रमाला विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, विभागीय उप आयुक्त सुरेश बेदमूथा, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या व आपणास आवश्यक कोणत्याही अडचणीमध्ये मदतीचे आश्वासन दिले.
श्रीगणेश मूर्ती विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे फीत कापून उद्घघाटन केले व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समूहातील महिलांनी तयार केलेल्या श्रीगणेश मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले. गतवर्षी 129 स्टॉल द्वारे 4 कोटी रुपयांच्या गणपती मूर्तीची विक्री करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी 183 स्टॉल उभारण्यात आले असून 5 कोटी गणेश मूर्ती विक्रीचे उद्दिष्ट आहे.
उद्घघाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश रामावत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मग्रारोहयो अनुपमा नंदनवनकर, शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूमकर, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, उषा मोरे, मीना रावताळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक विभीषण भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे तसेच जिल्हाB परिषदेचे कर्मचारी, तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया साळुंके यांनी केले.