मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
छत्रपती संभाजीनगर – क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनिश्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत तरुण सागरजी चौक सेव्हनहिल येथे प्रविण ऋषीजी मसा यांनी भेटीतील तरुण सागरजी महाराज यांची त्यांच्या मनातील इच्छा पर्युषण पर्व हे आठ किंवा दहा दिवस न बनावता श्वेतांबर जैन व दिंगंबर जैन मिळुन अठरा दिवसांचे संयुक्त पर्युषण पर्व संपन्न करावे.
दोन नद्या एकत्र मिळु शकतात. तसेच दोन्ही पंथांनी एकत्र येउन नद्यांना जसा संगत होतो तसा संगम समाजाने घडवुन आणावा अशी भावना व्यक्त केली.
गुरु परिवारातर्फे ७६ झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले तसेच महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन भक्तांबर विधान करण्यात आले.
या प्रसंगी गुरु परिवार अध्यक्ष विजय चांदीवाल, पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, पंचायत चे माजी अध्यक्ष ललीत पाटणी, पंकज फुलफगर, मिठालाल कांकरिया, पंचायत चे सर्व विश्श्वथ गुरु परिवारांचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले.