Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

प्रा.डॉ. रंजना दंदे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-

छत्रपती संभाजीनगर – नागरी विकास सेवाभावी संस्थेतर्फे दिल्या दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी प्रा. डॉ. रंजना दंदे निवड करण्यात आली होती. त्यांना शिक्षक दिना निमित्त पुरस्कार हा प्रदान करण्यात आला.

त्यांना हा पुरस्कार ऍड.आनंद सिंग बायस, विधीतज्ञ हायकोर्ट, ऍड.मिलिंद पाटील, अध्यक्ष, जिल्हा कोर्ट वकील संघ,प्रा. भीमसिंग राजपूत, दिगंबर बंगाळे आणि नागरी विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एल.डी. ताटू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक कार्या सोबतच त्यांच्या बोधि बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत बेघर, निरश्रीत, दिव्यांग, वृद्ध आणि अनाथ लोकांसाठी सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांच्या बोधी संस्थेमार्फत सध्या 3 शहरी बेघर निवारागृहात 175 पेक्षा अधिक लाभार्थी मोफत निवारागृहात वास्तव्यास आहेत.

या कार्याची दखल घेऊन नागरी विकास सेवाभावी संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केलेली होती. शिक्षण दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला. ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. मलाही समाजाचे काही देणे आहे ही भावना मनात रुजवून समाजाचे प्रबोधन आणि कार्य करण्यासाठी माझ्यावरती मोठी जबाबदारी आहे, असे मत प्रा. डॉ. ददे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमांमध्ये ऍड. सुभाष कोकुल्डे, भोरासिंग राजपूत, आनंद घारवाल, प्रा. भिमसिंग काहटे,प्रा.गुरुदत्त राजपूत, प्रा. बालाजी भगत, कविता भगत, आकाश बेलकार यांची उपस्थिती होती.

Related posts

राजाबजार जैन मंदिरात सुमतीसागरजी महाराज यांचा स्मृति दिवस उत्साहात साजरा

Gajanan Jogdand

स्वयंसहायता समूहातील महिलांनी सक्षम झाले पाहिजे – मंत्री अतुल सावे

Gajanan Jogdand

कपटाचा अभाव म्हणजेच आर्जव – आर्यिका विकुंदनश्री माताजी

Gajanan Jogdand

Leave a Comment