Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

राजाबजार जैन मंदिरात सुमतीसागरजी महाराज यांचा स्मृति दिवस उत्साहात साजरा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-


छत्रपती संभाजीनगर – खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्वाची आज दुस-या दिवशी उत्त्तम मार्दव या दिवशी आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी उदबोधन करतांना सांगितले क की, मान, दुराभिमान, अहंकार हा माणसाचा मोठा शत्रु आहे. अहंकार माणसाला हिन करतो.

अहंकाराचे त्याग म्हणजे मार्दव अर्थात मृदृता नंम्रता, विनय, आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी हे गुण धारण केले पाहिजे. विनयवान मनुष्याच्या जगात सर्वत्र आदर होतो. जो पर्यत आपल्यात अभिमान विदयमान आहे तो पर्यत मार्दव धर्म प्रगट होऊ शकत नाही.

मान सन्मान मिळविण्यासाठी आकांक्षा हिचं अंर्तरंगात कठोरता प्रथम मनात, वचनात, शरिरात येउâ लागते त्यामुळे मृदता नष्ट होते म्हणुन ज्ञानाचा, धनाचा, वैभवाचा, ऐश्वर्याचा, बळाचा, पदाचा, सौदर्याचा, अभिमान व्यर्थ आहे. अहंकारी व्यक्ती जवळ किती शक्ती संपन्नता असली तरी गर्वाचे घर नेहमी खालीच असते. असेही आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी पर्युषण पर्वाच्या दुस-या दिवशी उदबोधन केले. यावेळी क्षुल्लिका विजीताश्री माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती.


सर्व प्रथम सकाळी आज भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. तदनंतर बोलीया प्रारंभ होऊन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान अ‍ॅड.अनिल अलकादेवी कासलीवाल परिवार हिराकाका यांना मिळाला.

तसेच शांतीमंत्राचा मान उत्कर्षा सुभाषरावजी घोडके यांना मिळाला. तर भगवंताला अर्चनाफळ चढविण्याचा मान स्व.कौशल्याबाई झुंबरलालजी पाटणी परिवार अमनवाला यांना मिळाला तर मुनिश्री सुमतीसागरजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त्त महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्याचा मान महेशकुमार माणिकचंद कासलीवाल परिवार आडुळवाला यांना मिळाला.

तसेच उत्त्तम मार्दव धर्माचा कळस श्रीमती.शांताबाई रमनलालजी बाकलीवाल परिवार यांना मिळाला. तदनंतर दुपारच्या सत्रात आर्यिका विकुंदनश्री माताजी यांच्या उपस्थितीत तत्वार्थसुत्र या ग्रंथाचे पठन करण्यात आले. तसेच संध्याकाळी ६.३० वाजता श्रावक प्रतिकमण व संगीतमय भगवंताची महाआरती करण्यात आली. संपुर्ण कार्यकम नमोकार भक्तीमंडळाच्या साग्रसंतामध्ये करण्यात आला.

संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर विश्वस्त मंडळ व पर्युषण पर्व समितीने परिश्रम घेतले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.

Related posts

जायंट्स ग्रुप ऑफ़ चिकलठाणाच्या अध्यक्षपदी राहुल मुथा तर सचिवपदी गणेश इंदाणी

Gajanan Jogdand

जायंटस ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर प्राइड़च्या अध्यक्षपदी मंजु भारतीया तर सचिव पदी प्रिती सारडा यांची निवड

Gajanan Jogdand

प्रमुख गुंतवणूकदार विजय केडिया यांनी मोतीलाल ओसवाल यांचा प्रवास केला संगीतबद्ध

Gajanan Jogdand

Leave a Comment