मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
हिंगोली – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली, मिशन साहसी हिंगोली व डॉ. हेडगेवार दंत महाविद्यालय हिंगोली संयुक्त विद्यमाने एकदिवसीय विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
मिशन साहसी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे देण्यात आले. ज्यातून त्यांना स्वतःचं रक्षण कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मिशन सहासी हा युवतींना सक्षम करण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते आहे.
प्रविण पांडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मिशन साहसी च्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालय मध्ये जाऊन विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे मिशन सहासी च्या माध्यमातून देण्यात येतील आणि हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी कटीबद्ध आहे.
यावेळी हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, डॉ. हेडगेवार दंत महाविद्यालय हिंगोली चे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विवेक चौकसे, अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री प्रविण पांडे, जिल्हा सहसंयोजक सोनल चौधरी, शहर मंत्री विजय दराडे, शहर सहमंत्री आविष्कार गिरिकर, जिल्हा मेडीव्हिजन संयोजक दर्शन पाटील, शहर विद्यार्थिनी प्रमुख सेजल चव्हाण, यश जयनाईक,अक्षद पुरोहित, कराटे प्रशिक्षक बजरंग कदम, इसावे, अचल बेंगाळ व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.