मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्वाची आज उत्त्तम त्याग या दिवशी आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी आज पर्युषण पर्वाच्या प्रसंगी उदबोधन केले.
यावेळी क्षुल्लिका विजीताश्री माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व प्रथम सकाळी भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला.
तदनंतर बोलीया प्रारंभ होउन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा सौभाग्य अॅड.अनिल सौ.अलकादेवी कासलीवाल परिवार हिराकाका यांना मिळाला. शांतीमंत्राचा सौभाग्य अशोक चंद्रशेखर प्रशांत निखिल गंगवाल परिवार यांना मिळाला.
भगवंताला अर्चनाफळ चढवण्याचा सौभाग्य जयकुमार अमित अभिजीत सुमित कासलीवाल परिवार मिळाला तर परिवार सर्व औषधी अभिषेकचे भाग्य आगम भरत कासलीवाल परिवार यांना मिळाला.तसेच उत्त्तम त्याग धर्माचा कळस सुवर्णा सतीश ठोले यांना मिळाला .तसेच आज खासदार कल्यान काळे व मा महापौर ञ्यंबक तुपे यांनी भगवान शांतीनाथाचे व माताजी चे दर्शन घेतले.
यावेळी पंचायत वतीने यथोचित सन्मान करण्यात आला दुपारच्या सत्रात आर्यिका विकुंदनश्री माताजी यांच्या उपस्थितीत तत्वार्थसुत्र या ग्रंथाचे पठन करण्यात आले. तसेच संध्याकाळी ६.३० वाजता श्रावक प्रतिकमण व संगीतमय भगवंताची महाआरती करण्यात आली. संपुर्ण कार्यकम नमोकार भक्तीमंडळाच्या साग्रसंतामध्ये करण्यात आला.
यावेळी पर वस्तू वरील ममत्व सोडण्याला त्याग म्हणतात। मोहाचा त्याग झाल्याशिवाय पर पदार्थाचा त्याग होऊ शकत नाही. आम्ही जन्मतः बरोबर काहीच घेऊन येत नाही ।जी काही साधनसंपत्ती मिळविली ती येथेच आणि तीही पुण्य कर्माच्या ऊदयाने मिळवत आहोत। पण मृत्यू समयी कोणतीही वस्तू आपल्याबरोबर जाणार नाही ।फक्त आपली सुकृत्य आणि दुष्कृत्यच बरोबर जातील। माता-पिता, भाऊ-बहीण, पती-पत्नी ,मुलगा मुलगी ,धन वैभव, घर ,दुकाने, संपत्ती इत्यादी पर पदार्थावरील अनुराग, ममत्व या सर्वांचा त्याग करावाच लागतो। निसर्गाने ,सृष्टीने आम्हाला त्याग करायला शिकविले आहे.
झाडे जुन्या पानांचा त्याग करतात तेव्हाच नवीन पालवी फुटते। गायीच्या स्थना मध्ये दूध येते त्याचा तिला त्याग करावाच लागतो नाहीतर तिला त्रास होईलच.
तसेच माणसांनी त्याग करायला पाहिजे, व्यवहाराने ज्याचा आम्ही संचय केला आहे त्याचा त्याग करायला हवा। मनुष्य अन्न, औषधी ,उपकरण दान देऊन पुण्याची प्राप्ती करू शकतो, दान देणारेही लोक पुष्कळ असतात, पण फळाची ,नावाची अपेक्षा करीत नाही तेच खरे दानशूर असतात.
दुसऱ्याच्या उपकारार्थ आणि आपले स्वतःचे आत्मकल्याण साधण्यासाठी ज्याचा त्याग केला जातो त्याला सुद्धा दान म्हणतात ।दान योग्य ठिकाणी योग्य पात्र बघूनच केले पाहिजे. दानामध्ये अहंकार नको. दानाचे बीज योग्य वेळी, योग्य ठिकाणी पेरले तरच ते मोठ्या वटवृक्षात रूपांतरित होते. त्याचा उपभोग जीवनभर आपल्याला व इतरांनाही होतो।दान ही अतिशय उदात्त संकल्पना आहे। त्यात पुण्य दडलेले आहे.
संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर विश्श्वस्थ मंडळ व पर्युषण पर्व समितीने परिश्रम घेतले अशी माहीती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली