मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे. तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉ. विशालची साथ मिळाली. आजवरच्या सगळ्या अडचणींना सामोरं जात बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू आहे. वडिलांसोबत ती गरजू रुग्णांची सेवा घरच्या घरी करू लागली होती, पण आता हॉस्पिटलमध्येच रुग्णांची सेवा करून बयो आपले शिक्षणही घेते आहे.
मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत येऊन आपले स्वप्न पूर्ण करू पाहणारी बयो अनेक संकटांना सामोरी गेली आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी बयोही आपण पहिली. बयोला आपल्या आईचा पाठिंबा सुरुवातीपासूनच आहे. ही भूमिका अभिनेत्री विजया बाबर चोख बजावते आहे. तर तिच्या वडिलांची भूमिका अभिनेते विक्रम गायकवाड साकारत आहेत. ‘मालिकेने आता ६०० भागांचा टप्पा पार केला आहे.
मालिकेत आता बयो गणेशोत्सवासाठी आपल्या घरी कोकणात गेली होती. घरी गणपती बाप्पांचे आगमन पारंपरिक पद्धतीने झाले. त्यानंतर त्यांची पूजा केली. तिच्याबरोबर इरा आणि विशाल हेही कोकणात गेले होते. याच दरम्यान उत्सवाची संधी साधून बाप्पांचा आशीर्वाद घेऊन विशालने आपले बयोवरील प्रेम बयोकडे व्यक्त केले. पण बयोने प्रेम स्वीकारण्यास नकार दिला.
बयोचे विशालवर प्रेम आहे, पण तिने नकार दिला, कारण तिला जाणवलं की इराचंही विशालवर प्रेम आहे. पण विशाल मात्र बयोवर प्रेम करतो आणि त्याने तसे व्यक्त केले आहे. आता ह्या प्रेमाच्या त्रिकोणाला पुढे काय वळण मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आजवरचा बयोचा प्रवास खडतर होता, पण यापुढला तिचा प्रवास कसा असेल, हे मालिकेतल्या पुढल्या भागांत पाहायला मिळेल. इरा आणि बयो यांच्यामधले वाद आता काय वळण घेईल, हेही आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही मालिका!सोम. ते शनि., रात्री ८.३० वा., सोनी मराठी वाहिनीवर.