Marmik
सिनेमा

“धर्मवीर २” चा बॉक्स ऑफिसवर धमाका! १ कोटी ९२ लाखांचा गल्ला

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. पहिल्या चार दिवसात ९ कोटीं २७ लाखाची दमदार कमाई या चित्रपटाने केली आहे.

१५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे.चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मानत चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे.

महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शन मध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही.

“धर्मवीर २” या चित्रपटाची अजुन एक विशेष बाब म्हणजे, शिंदे यांची अगदी हूबे हुब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पहायला मिळत असून पडद्यावर मुख्यमंत्री यांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे.

केवळ वन टेक मध्ये मुख्यमंत्र्यांचा तो सीन झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले.

Related posts

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार!  २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

Gajanan Jogdand

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण!

Gajanan Jogdand

समाजाची परीक्षा

Gajanan Jogdand

Leave a Comment