Marmik
Hingoli live

उमरा येथे सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमासह पाणी परिषद, संमोहनशास्त्र व सुखी जीवन कार्यक्रमाचे आयोजन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – महाराष्ट्रासह देशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने 15 जानेवारी रोजी सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणी या प्रबोधनाच्या कार्यक्रमासह पाणी परिषद तसेच समूहनशास्त्र व सुखी जीवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाश्वत ग्रामीण विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहे. १५ जानेवारी २०२५ रोजी संस्थेचा ३० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणी या प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे हवमान अंदाज व शेतकऱ्यांनी करावयाचे नियोजन आणि संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड यांचे संमोहनशास्त्र व सुखी जीवन कार्यक्रमाचे आयोजन सांयकाळी ठीक ५:०० वा. ते रात्री १०:०० वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे.


१७ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी यांचासाठी कयाधू-आसना नदी खोरे विषयक ‘पाणी परिषद’ आयोजन करण्यात आली आहे. परिषदेत जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा (अध्यक्ष, जागतिक दुष्काळ व पूर नियंत्रण आयोग तथा रेमन मॅगेसेस पारितोषिक विजेते) आणि मल्लीनाथ कलशेट्टी (संचालक, प्रशिक्षण यशदा) पुणे, आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे पाटील ह्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमास कळमनुरी विधानसभा सदस्य आमदार संतोष (दादा) बांगर, हिंगोली विधानसभा सदस्य आमदार तान्हाजी मुटकुळे, वसमत विधानसभा सदस्य आमदार राजू नवघरे, विधान परिषद आमदार हेमंतराव पाटील, विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी अभिनव गोयल , मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, चला जाणुया नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य नरेन चुंग, डॉ. सुमंत पांडे, रमाकांत कुलकर्णी, प्रवीण महाजन, राजेश पंडित, अनिकेत लोहिया महेंद्र महाजन व जिल्हास्तरीय सर्व विभाग प्रमुख व सरपंच उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आयोजन अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी केले आहे.

Related posts

इयत्ता दहावीच्या परीक्षेला 98 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

Santosh Awchar

जि. प., पं. स. निवडणूक; आरक्षण निश्चितीसाठी 13 जुलै रोजी सभा

Santosh Awchar

जुन्या वादातून पप्पू चव्हाण यांच्यावर झाला गोळीबार; एक आरोपी पप्पू चव्हाण यांचा भाचा!

Santosh Awchar

Leave a Comment