Marmik
दर्पण

होय! ती प्रतिष्ठा द्वादशीच आहे..!!

विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

सुवासिक फुलांच्या सहवासाने त्या मातीलाही सुगंध प्राप्त होतो. तद्वत थोरांच्या सहवासाने सामान्यांनाही असामान्यत्व प्राप्त होतं. १९ फेब्रुवारी ही तशी सामान्यच तारीख, पण छत्रपती शिवरायांच्या जन्माने ती पूनित झाली. १४ मे छत्रपती संभाजी महाराजांनी पावन केली. १२ जानेवारीला राजमाता आयु साहेबांनी आणि स्वामी विवेकानंदांनी प्रतिष्ठा दिली. १४ एप्रिल बाबासाहेबांनी पुण्य केली, ०२ ऑक्टोबर बापूंच्या कामी आली. ज्या ज्या महामानवांनी ह्या देशाच्या जडणघडणीत आपल्या जीवित काळात राष्ट्रहिताचे कामं केले त्यांना त्यांना ह्या देशाने त्यांच्या त्यांच्या जन्म तारखांना आणि पुण्य स्मरणनांना गौरवांवित केलं. ते ही त्यांच्या त्यांच्या विशिष्ठ प्रकारच्या प्रेरक आणि आदर्श अभिमानाने केले. ज्यांचा केवळ काही वर्षाचा काळ ह्या देशाला लाभला आणि त्यांच्या अतुलनीय कार्याने हा देश, हे राष्ट्र ऊर्जेचा स्रोत बनला त्यांच्या बद्दल आपली भारतीय संस्कृती कृतज्ञ असते. श्रीराम तर ह्या राष्ट्राचा आत्मा आहे. त्यांच्या बद्दल आपण सदैव आपल्या सर्व पिढ्या नक्कीच कृतज्ञ असतील त्यात नवल काय..!

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचा जन्म दिन १४ नोव्हेंबर. त्यांना म्हणे लहान मुलं जरा जास्त प्रिय होती. तर त्यांच्या दिनाला “बालदिन” असं नाव दिलं. कुणीही आक्षेप घेतला नाही, घेण्याचं काही कारण नाही. कारण नेहरूंच्या योगदाना बद्दल हे राष्ट्र कृतज्ञ आहे. त्यांची कन्या देशाच्या पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या पुण्य दिनालाही एक नाव आहे. इंदिरा गांधींचा मुलगा म्हणजे नेहरूंचा नातू पूर्व पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या दिनाला देखील एक नाव आहे. ही नावं त्यांच्या त्यांच्या कार्याचा गौरव करणारी आणि देशातल्या तरुणाच्या मनात ऊर्जा निर्माण करणारी आहेत. लालबहादुर शास्त्री, चौधरी चरणसिंग, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. कलाम ही तशी सामान्यच माणसं. पण ह्यांचं कार्य इतकं मोठ्या उंचीच ठरल की त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी झाल्या. त्यांचा गौरव झाला पाहिजे. त्यातून ह्या राष्ट्राला प्रेरणा मिळाली पाहिजे हाच हेतू असतो.

सामान्य माणसांच्या बाबतीत आम्ही राष्ट्र हिताच्या योगदानामुळ कायम कृतज्ञ असतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामचंद्र ह्या देशाचा आत्मा आहे. श्रीराम ह्यांच्या बाबतीत लोकं आजही रामराज्याची कल्पना करतात. चांगल्या बाबीला श्रीरामाशी जोडून आपले विहित कार्य नीट पार पाडण्यासाठी प्रार्थना करतात. रामायणातील प्रत्येक पात्र हा मनुष्य जीवनात आदर्श असावा असाच. त्याचा भाव आणि प्रत्येक पात्राच आचरण आहे. भाऊ कसा असावा श्रीराम सारखा, एक वचनी कसं असावं श्रीरामासारख, मुलगा कसा असावा श्रीरामसारखा, शिष्योत्तम कोण श्रीराम, शत्रू देखील कसा असावा श्रीराम सारखा, मित्र कसा असावा श्रीराम सारखा, भाऊ कसा असावा श्रीराम सारखा, मुलगा कसा असावा श्रीराम सारखा, आजही सामान्य मानसातला आवाज हा आणि त्याची जीवन जगण्याची धारणा श्रीराम पर्यंत येते.

अशा आमच्या राजाला आमच्या आदर्शाला त्याच्याच देशात त्याच्या स्वतःच्या मंदिरात जाण्यासाठी शतकानुशतके संघर्ष करावा लागत असेल, तो संघर्ष देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर पासून सुरू झालेला असेल, स्वातंत्र्यानंतर देखील त्याला संघर्ष करावा लागत असेल आणि त्या इतक्या मोठ्या प्रचंड संघर्षा नंतर त्याची प्रतीक्षा संपून प्रतिष्ठा प्राप्त होत असेल आणि त्या ऊर्जा देणाऱ्या दिवसाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, एक प्रकारचं धार्मिक किंवा आध्यात्मिक स्वतंत्र म्हणत असतील आणि ज्या दिवसांच्या तिथीच्या सहवासाला “प्रतिष्ठा द्वादशी” असं सुरेख नाव देऊन त्याची कीर्ती आम्हा तरुणापर्यंत पोचण्यासाठी म्हणत असतील तर त्यात तथाकथित निवडणुकी पुरत का होईना स्वतःला “जानवधारी हिंदू” म्हणून घेणाऱ्या काँग्रेसला एकही निवडणूक जिंकून न देणाऱ्या, आपल्या देशाची बदनामी बाहेर देशात करतांना यत्किंचितही शरम न बाळगणाऱ्या राहुल गांधी ह्यांच्या पोटात दुखायच नेमकं कारण तरी काय? हा आम्हा तरुणांच्या समोर पडलेला प्रश्न आहे…

देश स्वातंत्र्य होऊन जवळपास ऐंशी वर्ष होत आली आहेत. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. राष्ट्रहितासाठी संघ सदैव अग्रेसर राहिलेला आहे. देशाच्या प्रत्येक घडामोडीत संघ आणि स्वयंसेवक ह्यांचं योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्य संग्रामापासून ते आजपर्यंत संघ आणि स्वयंसेवक देश हितासाठी समोर राहकेले आहेत. आजपर्यंतच्या प्रत्येक सरसंघचालकांनी आपल्या उद्बोधनातून राष्ट्रातील नव्हे तर परदेशातील भारतीय तरुणाईला आपल्या विचाराने प्रभावित केले आहे. त्या प्रेरनेतूनच जगभरातील जवळपास 84 देशात संघकार्य चालतं. आजही सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी मी कोण आहे हे विसरून देशासाठी सर्वस्व झोकून दिलेले आहे.

तिकडे मात्र काँग्रेसचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे मात्र आपली गरिमा विसरून विदेशात आपल्याच देशाची बदनामी करत फिरतात. देशाची एकता आणि सभ्यता नासवत ते आपले वक्तव्य करतात. सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष स्वतःला शंकराचा अवतार आहे असं जाहीरपणे सांगतात तेंव्हा तो अपमान नसतो का? सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी आमची अस्मिता असणाऱ्या श्रीराम ह्यांच्या प्राणप्रतिष्ठा दिनाला “प्रतिष्ठा द्वादशी” असं नाव दिलं असेल आणि ह्या देशातील सर्वच बांधवांना त्यावर आक्षेप नसेल तर ह्या बाकी लोकांवर लक्ष देण्याची फारसी गरज नाही…

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

दंड देतो रे ‘श्रीधर’

Gajanan Jogdand

‘संकल्प पत्र’; हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय?

Gajanan Jogdand

भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ कित्ता कोणीही गिरवावा…

Gajanan Jogdand

Leave a Comment