Marmik
दर्पण

वीर सावरकर आणि महाकुंभ समन्वय!

विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

सध्या चालू असलेल्या महा कुंभ धर्मभेद जातीभेद विसरून आपण सर्व एक आहोत असा संदेश दिला जात आहे. धर्म भेद, जातीभेदांना तिलांजली दिली जात आहे. अशी भारतीय हिंदू समाजातील जातींना अशी तिलांजली देणे काळाची गरज आहे ती यावर्षी या महा कुंभ मेळाव्यातून दिली जात आहे. ख्रिश्चन मिशनरी आज मोठ्या प्रमाणात हिंदू मधील तुटलेले असेच लोकं जमविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परत एकदा तीच स्थिती येऊ नये, एखादा समाज आपल्यातून किंवा समाजातील एखादा घटक तुटू नये म्हणून आपल्याला सर्वांना स्वतः पासून प्रयत्न करावे लागणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक सूचना “भारतात जन्माला आलेला प्रत्येक हिंदू आणि हिंदु हिंदू मधला रोटी – बेटी व्यवहार मोकळेपणाने व्हावा” ही प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचं आहे. आणि महाकुंभामध्ये सुद्धा त्या पासष्ट कोटी लोकांना आणि न जाऊ शकलेल्या शिल्लक राहिलेल्या तितक्याच लोकांना एक संदेश हाच आहे की ह्याच माध्यमातून आपल्याला सर्वांना ह्या भारत भूमीवर प्रेम करायचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि कुंभ समारोपाच्या निमित्ताने इतका एकच संदेश लक्षात घेतला तरी चालणारा आहे…

भारतीय संस्कृती “नित्य नूतन तरीही सनातन” अशीच आहे. बरं त्यात असं आहे की ही संस्कृती आजची नाही, हजारो वर्ष जुनी ही परंपरा आहे. नदीची धारा जसी प्रवाही असते, आणि प्रवाही धारा ही स्वच्छ, पवित्र असते, तशीच हिंदू संस्कृती ही प्रवाही आहे, स्वच्छ आहे आणि पवित्र आहे. ह्यामध्ये अनेक लोकांनी खुप मोठे बदल केले. केलेले बदल सर्वांनी मानवी सभ्यतेसाठी एकत्र आणले आणि ह्या संस्कृतीला मोठ्या पातळीवर नेले आहे, आणि अशाच काही महनीय प्रभूर्तीमुळे ही संस्कृती वाढलेली आहे.

चालू असलेल्या महाकुंभ मध्ये जवळ जवळ पासष्ट कोटी लोकं येऊन गेले, एकंदरीत आकडा हा सत्तर कोटी पर्यंत जाईल अशा स्थितीत आहे. जगभरातील पंच्यांनव टक्के देशांची लोकसंख्या ही सत्तर कोटी आहे, तितकी संख्या ही स्नान करून गेली आहे. ह्यात भारतीय जास्त आणि विदेशिदेखील संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पण ह्यात कोणताही धर्म भेद, जातीभेद झाला नाही. स्नान करताना, हॉटेल मध्ये जेवताना, रेल्वे इतर वाहनाने प्रवास करताना कोणीही कोणाच्या जातीची विचारणा केली नाही, हा इतका मोठा प्रवाह तिकडे जात असताना आज स्वातंत्रवीर सावरकर ह्यांची आठवण न आली तर नवलच…

कुंभामध्ये समरसता कुंभ ही संकल्पना राबविली आहे. इतर कुणीही कुणाला काहीही समजो पण आपण मात्र “भारत भूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हिंदूंचं समजायचं” असं सर्व संतांनी मह निर्णय घेतला आहे. ह्यावेळी विर सावरकर नक्की आठवतात. सावरकर म्हणाले होते, “देह आणि देव ह्यांच्या मधात देश नावाचा थांबा लागतो” किती सुंदर आणि सहज राष्ट्रभक्तीची व्याख्या सावरकरांनी केली होती. कुंभमध्ये समरसता कुंभ मध्ये जे निर्णय घेतले आहेत ते बऱ्यापैकी अगोदर आपल्या संस्कृतीने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वा सावरकरांच्या विचारातून अगोदरच गेले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समरसतेसाठी जितके मोठे प्रत्यक्ष प्रयत्न केले आहेत, ते प्रयत्न करतांना सावरकर म्हणतात “माझी एकवेळा मार्सेलीसची उडी विसरली तरी चालेल, पण रत्नागिरीत स्थानबद्ध असताना मी जे सामाजिक कार्य केले ते विसरू नका”. सावरकरांनी जातिअंतासाठी जे काम केलं ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे. कोणत्याही दलीत व्यक्तीला सोबत घेऊन सावरकर कोणत्याही तत्कालीन मोठ्या साम्राज्य असलेल्या व्यक्तींकडे जायचं आणि त्यांच्या घरी समरता साध्य करायची अशी पद्धीतीप्रमाणे काम सावरकरांनी केलं आहे.

एखादा विद्वान ब्राम्हण असेल त्याच्या घरी एखाद्या तत्कालीन हरिजन (लक्षात यावं म्हणून मी हा शब्द वापरत आहे, माझ्या लेखी सर्व बांधव एकसमान आहेत) व्यक्तीला सोबत घेऊन त्याच्या घरी सावरकर जात, पहिल्यांदा त्यांना सोबत जेवायला वाढायला सांगत, आणि त्या मालकाला सोबत घेऊन जेवत. हॉटेल, सिनेमागृह अशा प्रत्येक ठिकाणी सावरकरांनी असे जाती अंतासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आजही ते प्रयत्न प्रत्यक्ष येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ती सुरुवात आपल्या स्वतः पासून केली तर ठीक राहील, नसता केवळ पोपटपंची ठरेल. तेच ठरू नये म्हणून कुंभा मध्ये घेतलेले निर्णय आता ह्या माध्यमातून आपल्याला सर्व सामजासोबत आणि समाजा समोर न्यायचे आहेत..

कालच्या कुंभामध्ये भारतीय संस्कृती ही विश्वाला दर्शन देणारी आहे हे स्वीकारून फक्त तिला जे काही दोष आहेत ते बाजूला करून आपल्याला आपली संस्कृती किती उच्च पातळीची आहे हे समाजाला समजाऊन सांगायचं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर ह्यांनी देखील अस्पृश्यता निवारणासाठी धर्मांतराची घोषणा केली होती, त्या घोषणा नंतर हिंदू समाजाला त्या काळातील धुरीनांना सुधरायच्यासाठी वीस वर्षाचा मोठा काळ डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर ह्यांनी दिला होता. त्या दिलेल्या काळात आंबेडकरांना थांबविण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी ह्या दोघांनीच फक्त प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्याला अपयश आलं. पण त्या एका अपयशामुळे भारतातील एक मोठा लढवय्या समाज आपल्यातून दूर झाला.

ख्रिश्चन मिशनरी आज मोठ्या प्रमाणात हिंदू मधील तुटलेले असेच लोकं जमविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परत एकदा तीच स्थिती येऊ नये, एखादा समाज आपल्यातून किंवा समाजातील एखादा घटक तुटू नये म्हणून आपल्याला सर्वांना स्वतः पासून प्रयत्न करावे लागणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक सूचना “भारतात जन्माला आलेला प्रत्येक हिंदू आणि हिंदु हिंदू मधला रोटी – बेटी व्यवहार मोकळेपणाने व्हावा” ही प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचं आहे. आणि महाकुंभामध्ये सुद्धा त्या पासष्ट कोटी लोकांना आणि न जाऊ शकलेल्या शिल्लक राहिलेल्या तितक्याच लोकांना एक संदेश हाच आहे की ह्याच माध्यमातून आपल्याला सर्वांना ह्या भारत भूमीवर प्रेम करायचं आहे. भारताची ताखत वैश्विक स्तरावर दाखवायची असेल तर आपण सर्व भारतीय संस्कृतीचे संवाहक म्हणून तिच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी काम करणे गरजेचं आहे. आज सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि कुंभ समारोपाच्या निमित्ताने इतका एकच संदेश लक्षात घेतला तरी चालणारा आहे…

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

‘संकल्प पत्र’; हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय?

Gajanan Jogdand

अन्न साखळी बिघाडाने ‘शाकाहारी’ वन्य प्राण्यांचा हैदोस!

Gajanan Jogdand

राज्य सरकार संघ पुरस्कृत कसे..?

Mule

Leave a Comment