मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – वन सेवेत वन व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, हिंगोली वनपरिक्षेत्रातील वनपाल शिवरामकृष्ण चव्हाण यांना रजत पदक प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विभागीय वन अधिकारी कार्यालयासह राज्यभरातील वन अधिकारी, कर्मचाऱ्यांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
वन व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वनसेवेतील वन अधिकारी – कर्मचारी यांच्यासह सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी व वन्यजीव प्रेमींना काही लाख रुपयांपर्यंतची बक्षीसे देण्याची योजना आहे. हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांना अशाच प्रकारचा राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या नंतर हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयातील काही वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, करत आहेत. मात्र अशा प्रकारचा कोणताही पुरस्कार त्यांना दिला गेला नाही.
परंतु हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, हिंगोली वनपरिक्षेत्रातील वनपाल शिवरामकृष्ण चव्हाण व सेवानिवृत्त कर्मचारी सय्यद यांना वनसेवेत वन व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रजत पदक प्राप्त झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल हिंगोली विभागीय वन अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील वनसेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांतून आणि हिंगोली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिकांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांनी काही दिवसांपूर्वीच हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी पदाचा पदभार घेतलेला आहे. तर हिंगोली वनपरिक्षेत्रातील वनपाल शिवराम कृष्ण चव्हाण हे मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी सेनगाव आणि हिंगोली वनपरिक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.