Marmik
Hingoli live

सेनगाव पोलीस ठाणे अंतर्गत अवैध दारूचा महापूर! पहिल्या धारेची दारू मिळवण्यासाठी मद्यपींची गर्दी; पोलिसांचे अभय

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-


हिंगोली – येथील पोलीस ठाणे खाद्य अंतर्गत तसेच दुर्गम भागात दारूचा महापूर पहावयास मिळत असून पहिल्या धारेची दारू मिळविण्यासाठी मद्यपी या दारूच्या ठिकाणांवर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे सेनगाव पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून पोलिसांकडून त्यांना अभय दिले जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मानव विकास निर्देशांकात अतिशय मागास भाग म्हणून ओळखला जाणारा सेनगाव तालुका महाराष्ट्रभर तसेच देशात परिचित आहे तालुक्यात मूलभूत सोयी सुविधांची वाणवा आहेच शिवाय रोजगारही उपलब्ध नाही असे असताना सेनगाव तालुक्यात मात्र विविध भागात आणि डोंगराळ तसेच दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे.

देशी संत्रा, भिंगरी दारू सह हातभट्ट्यांची दारू आणि काही ठिकाणी इलायती दारूही अवैधरित्या विकली जात आहे. हे प्रमाण एवढे आहे की शाळाबाह्य मुले आणि काही महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले या दारूचे सहज प्राशन करून ते या दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे मानव विकास निर्देशांकात मागास असलेल्या या तालुक्यात मध्य त्यांची संख्या ही वाढत आहे.

या दारू विक्री कडे सेनगाव पोलिसांचे दुर्लक्ष झाले असून त्यांच्याकडून का कारवाई केली जात नाही ,असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन संबंधित पोलीस ठाणे अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Related posts

खटकाळी सब स्टेशन मध्ये घुसले पाणी! वीज पुरवठा बंद

Santosh Awchar

‘हिंगोली भूषण’ नायशा अन्सारी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र

Santosh Awchar

अतिवृष्टीग्रस्त आशा स्वयंसेवीकांना मदतीचा हात

Santosh Awchar

Leave a Comment