Marmik
Hingoli live

युवतीच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल; प्रेम संबंधानंतर विवाहास दिला नकार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील म्हाळशी गावातील बौद्ध समाजातील युवतीला विवाहाच्या खोट्या भुलथापा देवून सलग दोन ते तीन वर्ष प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर प्रियकर आरोपी व त्याच्या कुटुंबाकडून प्रेमविवाहास नकार मिळाल्यामुळे निराश होवून या युवतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना 11 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हयातल्या सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील घटनेने गाव हादरले असून याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये सचिन बरडे, रामेश्वर बरडे, शोभा बरडे व अश्विनी बरडे या चौघांविरुध्द भांदवी कलम ३०६, ३४१, ५०६, ३४ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३ (२) ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. घटनेचा निष्पक्ष तपास पोलीस उपअधिक्षक यतीश देशमुख व उपनिरिक्षक श्रीदेवी पाटील यांनी केला.   

मृत मृत युवतीही आईवडील आणि तीन भावांसह म्हाळशी येथील रहिवासी आहे. आरोपी सचिन बरडे याचा गावात मंडप डेकोरेशन व टेम्पो चालविण्याचा व्यवसाय आहे. गावातच या दोघांशी ओळख व प्रेमसंबंध प्रस्थापित झाले व दोघे एकमेकांना भेटु लागले. या प्रेमसंबंधाची कुणकुण युवतीच्या आईवडीलांना लागताच त्यांनी आपण मागासवर्गीस असून तो मराठा असल्यामुळे त्याला भेटू नको असे युवतीला समजावून सांगीतले. परंतु सचिन माझ्याशी लग्न करणार असून त्याने तसे वचन दिले असे प्रतिउत्तर युवतीने वडीलांना दिले. त्यानंतर सचिनने युवतीला लग्नाचे आमिष दिल्यामुळे दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते.

११ जुलैला घटनेच्या दिवशी सचिन युवतीला त्याच्या घरी घेवून गेला असता सचिनसह त्याचे आई-वडील आणि घरच्यांनी युवतीला आंतरजातीय विवाह करण्यास नकार देऊन मराठा असून महाराची पोरगी आमच्या घरी कशी काय राहील. तु आम्हाला त्रास देशील तर तुला व तुझ्या नातेवाईकांना जिवंत ठेवणार नाही. प्रियकर व त्याच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यामुळे व प्रसंगी प्रेमप्रकरणामुळे गावात झालेल्या बदनामीमुळे निराश होवून या युवतीने विषारी औषध प्राशन केले. युवतीच चे वडील हे तिला दवाखान्यात नेत असताना तर रामेश्वर बर्डे याने त्यांची मोटारसायकल अडवली दिक्षा ने झालेल्या बदनामीने व आरोपींच्या त्रासाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.  

याप्रकरणी युवतीच्या वडिलांच्या यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन रामेश्वर बरडे, रामेश्वर सूर्यभान बरडे, शोभा रामेश्वर बरडे व अश्विनी हरिदास बरडे या चौघांविरुध्द भांदवी कलम ३०६, ३४१, ५०६, ३४ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३ (२) ५ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेतील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकार यतीश देशमुख हे करत आहेत.

Related posts

सतत गुन्हे करणारी टोळी पोलीस अधीक्षकांच्या हिटलिस्टवर ! पुसेगाव येथील दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश, दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे हिंगोली प्रशासनातील अधिकाऱ्यांशी साधला संवाद

Santosh Awchar

हुंडा पध्दती निर्मूलनासाठी अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

Leave a Comment