मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – येथील विद्यमान नगरसेविका आणि त्यांचे पती माजी नगराध्यक्ष यांच्यावर सेनगाव पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सेनगाव येथे मोठी चर्चा होत असल्याचे दिसते.
सेनगाव येथील नगरसेविका स्वाती संदीप बहिरे व त्यांचे पती संदीप बाबुलाल बहिरे यांनी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास संगणमत करून फिर्यादी अश्विनी प्रकाश हरण (वय 27 वर्ष व्यवसाय घरकाम रा. धुमाळ गल्ली,
सेनगाव) यांचे पती प्रकाश शिवाजी हरण यांच्याविरुद्ध छेडछाड व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसात दाखल करतो अशी धमकी देऊन सदरील तक्रार मागे घ्यायची असेल तर आम्हाला दोन लाख रुपये द्या, अशी खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची तक्रार दिली.
याप्रकरणी नगरसेविका स्वाती संदीप बहिरे व त्यांचे पती माजी नगराध्यक्ष संदीप बाबुलाल बहिरे यांच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात 351 / 2023 भादंवि कलम 384, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोह 605 चव्हाण हे करत आहेत.