Marmik
Hingoli live क्राईम

मानवत खून प्रकरण; वर्षभरापासून फरार आरोपीस घातक हत्यारासह घेतले ताब्यात

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – परभणी जिल्ह्यातील मानवत येथील खून प्रकरणातील वर्षभरापासून फरार आरोपीस वसमत येथून घातक शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे. ही कार्यवाही हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक नेमून विशेष पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे.

या अनुषंगाने 13 नोव्हेंबर 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक वसमत उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मानवत पोलीस ठाणे (जि. परभणी) हद्दीत मागील एक वर्षापासून मानवत खून प्रकरणातील फरार आरोपी नामे रणसिंग कन्हैयासिंग टाक (वय 30 वर्ष रा. वसमत

जि. परभणी) हा शिकलकरी वसमत येथे कमरेला खंजीर लावून फिरत आहे, अशी माहिती मिळाली. यावरून पोलीस पथकाने तात्काळ शिकलकरी वस्ती रेल्वे स्टेशन परिसर वसमत येथे जाऊन छापा मारला.

यावेळी खून प्रकरणातील फरार आरोपी रणसिंग टाक यास खंजिरासह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपी हा परभणी पोलिसांना मागील एक वर्षापासून मानवत खून प्रकरणात अटक चुकविण्यासाठी गुंगारा देत होता.

ही कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक यामावार, अंमलदार शेख बाबर, नंदकुमार सोनवणे, अविनाश राठोड, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.

Related posts

राष्ट्रीय युवा दिन निमित्त आदर्श महाविद्यालयात रोल प्ले स्पर्धा

Gajanan Jogdand

गुजरात दंगल; 11 दोषींची माफी रद्द करून त्यांना फाशी द्या

Santosh Awchar

मध्यान्न जेवण निकृष्ट दर्जाचे; आमदार संतोष बांगर यांनी कामगार अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले

Santosh Awchar

Leave a Comment