मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – बासंबा पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीस हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बासंबा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. सदरील आरोपी हा औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा येथे त्याच्या नातेवाईकाकडे गेला होता.
हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या खरवड येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.
सदरील घटना घडल्यानंतर यातील फरार आरोपी नामे अमजद खान आलम खान पठाण (रा. मोरवड ता. कळमनुरी) हा फरार झाला होता सदरील आरोपीच्या शोधात बासंबा पोलीस ठाणे व हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते.
सदरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा व बासंबा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा येथे त्याच्या नातेवाईकाकडे गेला होता.
सदरील कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, पोलीस अंमलदार मदन गव्हाणे, राजू ठाकूर, नितीन गोरे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले कैलास गुंजकर यांच्या पथकाने केली.